शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Kojagiri Purnima 2021 : आज कोजागरी पौर्णिमेला 'या' चार राशींवर बरसणार शरदाचं चांदणं; कोण आहेत ते भाग्यवान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 14:12 IST

1 / 5
को जागर्ति अर्थात कोण जागे आहे, हे पाहत लक्ष्मी माता घरोघरी डोकावते आणि प्रत्येकाला त्याच्या योग्यतेनुसार वरदान देते. आजच्या दिवशीच्या राशी भविष्यानुसार विशेषतः चार राशींवर शरदाचे चांदणे म्हणजेच सुख, वैभव प्राप्तीची संधी प्राप्त होणार आहे. त्या चार राशी कोणत्या हे जाणून घेऊ.
2 / 5
शरद पौर्णिमेचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल.नोकरी व्यवसायात उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठेत वाढ होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामामुळे वरिष्ठ खुश होतील. गुंतवणुकीसाठी वेळ चांगली आहे. लवकरच वाहन खरेदीचे योग आहेत.
3 / 5
कन्या राशीच्या लोकांना आर्थिक वाढीची शक्यता आहे. नोकरदारांना वेतन वाढ, बोनस वाढीव मिळण्याची संधी आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. तुम्ही प्रत्येक काम जबाबदारीने पूर्ण कराल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. व्यावसायिकांना नफा होईल. लक्ष्मी मातेच्या विशेष कृपेमुळे पैशाचे व्यवहार सुरळीत होतील.
4 / 5
जोडीदाराशी संबंध दृढ होतील. भागीदारीच्या कामात प्रचंड नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांच्या कामामुळे त्यांचे वरिष्ठ प्रभावित होतील. दरम्यान कर्जमुक्तीचे योग आहेत. नवीन काम सुरू केल्यास यशप्राप्ती होऊ शकेल.
5 / 5
तूळ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कदाचित ऑफिसच्या कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवासही लाभदायक ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळू शकते. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळू शकेल अशी अनुकूल ग्रहस्थिती निर्माण होत आहे, त्याचा अवश्य लाभ घ्या.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषkojagariकोजागिरी