शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

2023 Horoscope : २०२३ मध्ये चमकणार 'या' राशींच्या लोकांचं नशीब, देवी लक्ष्मीची होणार कृपा; अपार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 20:15 IST

1 / 6
२०२३ मध्ये शनि, गुरु, राहू, केतू यासह इतर ग्रहांच्या बदलाचा प्रभाव वेळोवेळी सर्व राशींवर दिसून येईल. वर्षाच्या सुरुवातीलाच शनीच्या राशी बदलामुळे अनेक राशींवर शनीचा प्रतिकूल प्रभाव दूर झाल्यामुळे जीवनात हळूहळू बदल दिसून येतील. अशा स्थितीत २०२३ हे वर्ष ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून चार राशींसाठी खूप शुभ आणि फलदायी ठरू शकते.
2 / 6
यावर्षी मेष, मिथुन, तूळ आणि धनु राशीच्या लोकांना विशेषतः ग्रहांच्या शुभ स्थितीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या समस्यांमध्ये सुधारणा दिसून येईल. २०२३ मध्ये कोणत्या राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असेल ते सविस्तर जाणून घेऊया.
3 / 6
मेष- २०२३ मध्ये तुमचा अध्यात्माकडे कल वाढेल. धार्मिक कार्यासाठी प्रवासही होऊ शकतो. जुनी नाती अधिक मजबूत होतील. अविवाहातीसांठी विवाहाचे योगही संभवतात. जीवनसाथीसोबत उत्तम संबंध राहतील. भागीदारीत जर तुम्ही व्यवसाय करण्याच्या विचारात असाल तर हे वर्ष तुमच्यासाठी योग्य ठरण्याची शक्यता आहे. तुमची कमाईही चांगली होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी यावर्षी अनेक संधी मिळण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात अधिकारी वर्गाशीही चांगले संबंध राहतील. पद प्रतिष्ठा आणि पदोन्नतीचेही योग संभवतात.
4 / 6
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांसाठी नवं वर्ष आशेची किरण आणू शकतो. घरात एखाद्या शुभ कार्यक्रमाचं आयोजन होण्याची शक्यता आहे. तसंच कोणतंही कर्ज सुरू असेल तर त्यातूनही तुम्ही मुक्त होऊ शकता. घर किंवा वाहन खरेदीच्या प्रयत्नात असाल तर तुमची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. एप्रिल नंतरचा कालावधी अधिक अनुकूल ठरू शकतो. या काळात लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसंच तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला त्यात यशही मिळू शकतं. विद्यार्थ्यांनाही या कालावधी चांगला ठरण्याची शक्यता आहे. जर एखाद्या गोष्टीत बाधा येत असेल तर ती देखील दूर होऊ शकते.
5 / 6
तूळ - नव्या वर्षांत तुम्हाला कायम आठवणीत राहिल अशी आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे. तसंच करिअरमध्ये तुम्हाला नव्या संधीही मिळू शकतात. आर्थिक बाबींमध्येही यश मिळण्याची शक्यात आहे. हे वर्ष तुमच्यासाठी उत्तम ठरू शकते. घरात एखादं शुभकार्य घडू शकतं. तुमचं आरोग्यही या काळात उत्तम राहिल. जीवनसाथीचीही तुम्हाला चांगली साथ मिळेल. घर आणि वाहनाची इच्छाही पूर्ण होण्याची शक्यता आहे.
6 / 6
धनु - नव्या वर्षांत भाग्याची साथ मिळेल आणि आर्थिक बाबींमध्येही चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात प्रगती, धन संपत्तीतही वाढ होऊ शकते. तुम्ही एखादी जमिन किंवा घर घेण्याचा विचार करू शकता. एका पेक्षा अधिक स्त्रोतांमधून धन कमावू शकता. कुटुंबातही आनंदाचं वातावरण राहिल. जानेवारी महिन्याच्या अखेरपासून सकारात्मक अनुभव येऊ लागतील. शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही यश मिळण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर त्यातही यश मिळण्याची शक्यता आहे. तुमची मेहनत कामी येईल आणि तुमचा प्रभावही वाढू शकतो.
टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यAstrologyफलज्योतिष