शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

नशीबाच्या बाबतीत ‘या’ ४ राशीचे लोकं असतात भाग्यवान; कमी वयात कमावतात अपार यश अन् पैसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 15:15 IST

1 / 9
भारतीय प्राचीन संस्कृती आणि परंपरांमध्ये ज्योतिषशास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याविषयीचा अंदाज बांधला जाऊ शकतो. माणसाच्या जन्म कुंडलीचा अभ्यास करून अनेक गोष्टी समजावून घेतल्या जाऊ शकतात.
2 / 9
माणसाला आपले प्रारब्ध इथेच भोगावे लागते, असे म्हटले जाते. नशीबात होतं ते घडतच. काही जण फार कष्ट, मेहनत करत असतात. मात्र, नशिबाची आणि भाग्याची योग्य साथ न लाभल्याने यश, प्रगती प्राप्त करू शकत नाहीत, असे सांगितले जाते.
3 / 9
मात्र, काही जणांना भाग्याची, नशीबाची उत्तम साथ लाभते. योग्यवेळी आणि योग्य ठिकाणी नशीबामुळे अनेक गोष्टी जुळून येऊ शकतात. परिश्रम, मेहनतीला नशीब आणि भाग्याचे पाठबळ मिळाले, तर ती व्यक्ती कमी कालावधीत यशोशिखरावर पोहोचल्याचे पाहायला मिळू शकते.
4 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशीच्या व्यक्ती या नशिबाच्या बाबतीत भाग्यवान मानल्या जातात. या व्यक्तींना नशीब आणि भाग्याचा उत्तम पाठिंबा मिळतो. मेहनत आणि परिश्रमाला भाग्य तसेच नशीबाची जोड मिळाल्याने कमी वयात अपार यश, कीर्ती, धन-दौलत कमावू शकतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
5 / 9
मेष राशीच्या व्यक्ती नशीबाचे धनी मानले जातात. या राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीच्या व्यक्ती हातात घेतलेली कामे मनापासून आणि प्रामाणिकपणे पार पाडतात. मेहनत, परिश्रम करायला मागे-पुढे पाहत नाहीत. यामुळे यश, प्रगती साध्य करू शकतात. यांचा भाग्याची उत्तम साथ लाभते. एकदा मनात ठरवले की, ती गोष्ट पूर्ण करूनच थांबतात, असे म्हटले जाते. या राशीच्या व्यक्तींमध्ये चांगले नेतृत्व गुण असतात.
6 / 9
वृश्चिक राशीच्या व्यक्ती निडर आणि साहसी मानल्या जातात. या राशीच्या व्यक्तींवर मंगळ ग्रहाचा प्रभाव अधिक असल्याचे म्हटले जाते. आयुष्यात जी गोष्ट कमवायची आहे, त्यासाठी ते अपार कष्ट, मेहनत, परिश्रम घेतात, ही त्यांची खासियत मानली जाते. कष्ट आणि मेहनतीची दिशा योग्य असेल, तर कमी वयात मोठे यश प्राप्त करू शकतात. उत्तम पैसे कमावू शकतात. समाजात मान-सन्मान, प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते, असे सांगितले जाते.
7 / 9
मकर राशीच्या व्यक्तींवर शनी देवांचा प्रभाव अधिक असतो. या राशीचा स्वामीही शनी देव आहे. मकर राशीच्या व्यक्तीही निडर आणि साहसी मानल्या जातात. या व्यक्तींकडे संयम असते. मेहनत करण्याची तयारी असते. या व्यक्तींना भाग्याची उत्तम साथ लाभते. ज्या क्षेत्रात काम करतात, त्यामध्ये यश, प्रगती साध्य करू शकतात. कमी वयात यशाच्या अनेक पायऱ्या या व्यक्ती पार करू शकतात. या व्यक्तींना मोठी प्रसिद्धी, लोकप्रियता लाभते, असे सांगितले जाते.
8 / 9
कुंभ राशीच्या व्यक्ती बुद्धिमान असल्याचे मानले जाते. या राशीचा स्वामी शनीदेव असल्याने या व्यक्तींवर शनी महाराजांची कृपा असते, असे सांगितले जाते. या राशीच्या व्यक्ती पैसे कमावण्यात माहीर असल्याचे म्हटले जाते. या व्यक्तींची आर्थिक स्थिती चांगली असते. भाग्याची आणि नशिबाची योग्य साथ लाभल्याने कमी वयातच या व्यक्ती अपार यश, प्रगती, पैसा कमावू शकतात, असे म्हटले जाते.
9 / 9
सदर माहिती ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे. एखाद्या व्यक्तीला आपल्या आणि भविष्यातील घटनांबाबत योग्य माहिती हवी असल्यास जन्मकुंडलीसह तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकते, असे सांगितले जाते.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य