शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

३ ग्रहांचे स्थानपरिवर्तन: पुढील ४ महिने ‘या’ ४ राशींना लाभच लाभ; पैसा, भाग्योदय, भरभराटीचा काळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 08:30 IST

1 / 9
आगामी काही दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहायला गेल्यास महत्त्वाचे मानले गेले आहे. नवग्रहांपैकी प्रमुख तीन ग्रह राशीपरिवर्तन करणार असून, याचा प्रभाव सर्व राशीच्या व्यक्तींवर झालेला पाहायला मिळू शकेल. ज्योतिष शास्त्रानुसार येणाऱ्या चार महिन्यांहून अधिक काळ हा काही राशींसाठी फार फायद्याचा ठरणार आहे. (jupiter mercury and mars position 2022)
2 / 9
ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा सर्वच राशींवर चांगला अथवा वाईट परिणाम होतो. येणाऱ्या महिन्यात अनेक ग्रह वेगवगेळ्या राशींमध्ये प्रवेश करणार आहेत. मंगळ, गुरु आणि बुध ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करताना दिसतील. ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ ग्रहाला नवग्रहांचा सेनापती मानले जाते. तर बुध ग्रह हा बुद्धी, तर्क, संवाद, गणित, हुशारी आणि मैत्रीसंदर्भातील गोष्टींवर परिणाम करणार असतो. (guru budh and mangal gochar 2022)
3 / 9
तर वैदिक ज्योतिष शास्त्राप्रमाणे गुरु हा सर्वात महत्वाच्या ग्रहाकांपैकी एक मानला जातो. हा ग्रह ज्ञान, शिक्षण, मुलंबाळं, बंधू, शिक्षक, धार्मिक कार्य, पवित्र ठिकाणं, पैसा, दान, पुण्य आणि भरभराटीसंदर्भातील गोष्टींशी निगडीत असतो. काही राशीच्या व्यक्तींवर गुरु, मंगळ आणि बुध ग्रहाची विशेष कृपा राहील असे सांगितले जात आहे.
4 / 9
गुरु, मंगळ आणि बुध या ग्रहांची स्थिती राशीसाठी सकारात्मक असल्यास भाग्य बदलण्यासाठी मदत होतो असे म्हटले जाते. या पुढील ४ महिन्यांमध्ये कोणत्या राशींच्या लोकांची भरभराट होणार असल्याचे सांगितले जात आहे, ते जाणून घेऊया...
5 / 9
मिथुन राशीच्या लोकांना आगामी काळात चांगले यश मिळू शकेल. अनेक अडकलेली काम पुन्हा सुरु करण्यासाठी हा योग्य काळ आहे. चांगल्या आणि प्रभावशाली लोकांशी भेटीगाठी होतील. प्रवास करण्याची संधी या कालावधीमध्ये मिळेल. व्यापारामध्ये चांगला फायदा होईल. या राशीचे लोक जे काम हाती घेतील त्यामध्ये यश येईल. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील.
6 / 9
सिंह राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती बळकट होऊ शकेल. सिंह राशीच्या लोकांसाठी हा कालावधी आशिर्वादाप्रमाणे असेल. वैवाहिक जीवनामध्ये सुख लाभेल. पद आणि प्रतिष्ठेमध्ये वृद्धी होण्याची चिन्हं दिसत आहेत. नवीन वाहन किंवा घर खरेदीचा उत्तम योग जुळून येत आहे. व्यापारी वर्गातील लोकांसाठी हा काळ फायद्याचा ठरेल. या कालावधीमध्ये एकंदरीत जीवनमान हे सुखी आणि समाधानी असेल.
7 / 9
तूळ राशीच्या व्यक्तींना नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल. कामाचे क्षेत्र बदलण्याचा योग जुळून येत आहे. व्यापारामध्ये नफा होईल. कौटुंबिक वाद संपुष्टात येतील. धार्मिक कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी चालून येईल. नोकरीच्या ठिकाणी या राशीच्या व्यक्तींच्या कामाची दखल घेऊन कौतुक होण्याची शक्यता आहे. पती आणि पत्नीमध्ये योग्य ताळमेळ या कालावधीमध्ये असल्याने कौटुंबिक कलह होणार नाही.
8 / 9
वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यापारासाठी उत्तम काळ आहे. वैवाहिक आयुष्य सुखी आणि समाधानी असेल. नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होतील. धार्मिक विधी आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची अधिक संधी मिळेल. स्पर्धात्मक आव्हाने या राशीचे विद्यार्थी सहज पेलू शकतील. वरिष्ठ अधिकारी या राशीच्या लोकांच्या कामाने समाधानी असतील.
9 / 9
नवग्रहांपैकी सदरचे तीनही ग्रह अतिशय प्रभावशाली असून, त्यांचे वैशिष्ट्य, चलन आणि कुंडलीतील स्थानांप्रमाणे मिळणारे फळ महत्त्वाचे मानले जाते. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य