1 / 15सन २०२२ मधील जून महिना आहे. धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून मे महिन्याप्रमाणे जून महिनाही विशेष आणि उत्तम मानला जात आहे. गंगा दशहरा, निर्जला एकादशी वटसावित्रीसह अनेकविध सण-उत्सव, व्रत-वैकल्ये जून महिन्यात साजरी केली जात आहेत. (June Planetary Transit 2022)2 / 15ज्योतिषीय दृष्टिने विचार केल्यास जून महिन्यात ५ मोठे आणि महत्त्वाचे ग्रह स्थानबदल करणार आहेत. जूनच्या सुरुवातीला ३ जून रोजी वक्री असलेला नवग्रहांचा राजकुमार बुध वृषभ राशीत मार्गी होत आहे. तसेच नवग्रहांमध्ये न्यायाधीश मानला जाणारा शनि कुंभ राशीत वक्री होत आहे. (June 2022 Astrology)3 / 15नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य १५ जून रोजी मिथुन राशीत प्रवेश करेल, तसेच नवग्रहांचा सेनापती मंगळ २७ जून रोजी आपलेच स्वामित्व असलेल्या स्व-राशीत म्हणजेच मेष राशीत प्रवेश करेल. तर, शुक्रही १८ जून रोजी स्व-राशीत म्हणजेच वृषभमध्ये प्रवेश करेल.4 / 15जून महिन्यातील ज्योतिषीय घटनांचा सर्व राशीच्या व्यक्तींवर प्रभाव पडणार आहे. काही राशीच्या व्यक्तींसाठी तो सकारात्मक असेल, तर काहींना तो संमिश्र असेल. प्रतिकूल प्रभाव असलेल्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींना हा काळ लाभदायक ठरेल? जाणून घेऊया...5 / 15मेष राशीच्या व्यक्तींना जून महिना काहीसा संमिश्र ठरू शकेल. वडिलांशी मतभेद वाढू शकतात. भावंडांशी अपेक्षित सहकार्य मिळेलच असे नाही. परदेशात जाऊ इच्छिणाऱ्यांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक स्थिती सामान्य राहू शकेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे उपयुक्त ठरू शकेल.6 / 15वृषभ राशीच्या व्यक्तींना जून महिना शानदार ठरू शकतो. कौटुंबिक वातावरण आनंदी राहू शकेल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला काळ व्यतीत करू शकाल. आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. लाभाच्या उत्तम संधी प्राप्त होऊ शकतील. बचतीच्या योजना यशस्वी ठरू शकतील. मानसिक ताण-तणाव दूर करण्यासाठी योग, ध्यानधारणा करण्याचा सल्ला दिला जात आहे.7 / 15मिथुन राशीच्या व्यक्तींना जून महिना मध्यम फलदायी ठरू शकेल. नाहक खर्च टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. जमा-खर्चाचा ताळमेळ योग्य ठेवावा. आर्थिक स्थिती सामान्य राहू शकेल. दुसऱ्यावर जो विसंबला... या म्हणीचा प्रत्यय कार्यक्षेत्रात येऊ शकेल. काही समस्यांचा सामना करावा लागू शकेल. गुंतवणूक करताना योग्य सल्ल्याशिवाय अंतिम निर्णय घेऊ नये. रागावर नियंत्रण ठेवावे. 8 / 15कर्क राशीच्या व्यक्तींना जून महिना काहीसा संमिश्र ठरू शकेल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होऊ शकतात. कौटुंबिक संपत्तीवरून वादाचे प्रसंग उद्भवू शकतील. आरोग्याची काळजी घ्यावी. भागीदारीतील व्यवसायिकांनी मतभेद दूर करावेत, अन्यथा आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते. दाम्पत्य जीवनात गैरसमज वाढू न देणे उपयुक्त ठरू शकेल. 9 / 15सिंह राशीच्या व्यक्तींना जून महिना शुभ ठरू शकेल. आत्मविश्वास वाढीस लागेल. नोकरीत प्रतिष्ठा वृद्धिंगत होऊ शकेल. विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी यश, प्रगती साध्य करणारा ठरू शकेल. कुटुंबात आनंद द्विगुणित करणाऱ्या घटना घडतील. आर्थिक स्तरावर हा महिना अनुकूल ठरू शकेल. धनलाभाच्या संधी प्राप्त होऊ शकतील. 10 / 15कन्या राशीच्या व्यक्तींना जून महिना संमिश्र ठरू शकेल. छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हवे. वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी. हितशत्रू आणि विरोधकांपासून सावध राहावे. गुप्त गोष्टी शेअर न करणे हिताचे ठरेल. रागावर नियंत्रण ठेवा. अन्यथा नोकरी, कार्यक्षेत्रात समस्यांचा सामना करावा लागू शकेल. हाती घेतलेले काम जबाबदारीने आणि वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. वरिष्ठांशी वाद टाळावेत. 11 / 15तूळ राशीच्या व्यक्तींना जून महिना सकारात्मक ठरू शकेल. नोकरदार वर्गाला यश, प्रगतीचे मार्ग साध्य करता येऊ शकतील. भाग्याची आणि नशिबाची उत्तम साथ लाभेल. कार्यक्षेत्रात हाती घेतलेले काम यशस्वीरित्या पूर्ण करू शकाल. शेअर मार्केटमधून लाभ मिळू शकतील. आर्थिक स्थिती उत्तम राहू शकेल.12 / 15वृश्चिक राशीच्या व्यक्तींना जून महिना यशकारक ठरू शकेल. नोकरदार वर्गाला पदोन्नती आणि वेतवृद्धीचा लाभ मिळू शकेल. व्यापार, व्यवसायात शुभ योगामुळे लाभाच्या उत्तमोत्तम संधी मिळू शकतील. विद्यार्थ्यांना सदर काळ यशकारक ठरू शकेल. आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. मेहनतीचे चीज होऊ शकेल. आनंद द्विगुणित करणाऱ्या घटना घडू शकतील.13 / 15धनु राशीच्या व्यक्तींसाठी जून महिना प्रगतीकारक ठरू शकेल. नोकरदार वर्ग आणि व्यापाऱ्यांना लाभाच्या अपार संधी प्राप्त होऊ शकतील. कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धीचा अनुभव घेऊ शकाल. मानसिक तणाव दूर होऊ शकेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतील. आर्थिक स्थिती चांगली असू शकेल. मात्र, डोळ्यांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. 14 / 15कुंभ राशीच्या व्यक्तींना जून महिना मध्यम फलदायी ठरू शकेल. खासगी तसेच कौटुंबिक गोष्टींमुळे कामात लक्ष लागणार नाही. रागावर नियंत्रण आणि वाणी संयमित ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. ऐकीव गोष्टींवर अधिक विश्वास न ठेवणे हिताचे ठरू शकेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे. अनावश्यक गोष्टींवर खर्च टाळावेत. प्रेमात असलेल्यांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. 15 / 15कुंभ राशीच्या व्यक्तींना जून महिना मध्यम फलदायी ठरू शकेल. खासगी तसेच कौटुंबिक गोष्टींमुळे कामात लक्ष लागणार नाही. रागावर नियंत्रण आणि वाणी संयमित ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. ऐकीव गोष्टींवर अधिक विश्वास न ठेवणे हिताचे ठरू शकेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे. अनावश्यक गोष्टींवर खर्च टाळावेत. प्रेमात असलेल्यांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे.