तुमच्या कुंडलीत आहे का महाभाग्य योग? अकल्पनीय यश, अमाप धन; अनपेक्षित लाभ, भाग्योदय-भरभराट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 12:37 IST
1 / 12Mahabhagya Rajyoga: व्यक्तीच्या कुंडलीत असे काही योग जुळून आलेले असतात, ज्याची आपल्याला फारशी कल्पना नसते. काही योग काही एका वर्षानंतर भरभराट करतात, तर काही योगांमुळे समस्या, अडचणींनाही सामोरे जावे लागू शकते, असे म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीची कुंडली त्याचे आयुष्य, व्यक्तिमत्व आणि अनेक गोष्टींबाबत काही संकेत नक्की देत असते.2 / 12व्यक्तीच्या कुंडलीत काही शुभ योग आणि राजयोग असतात जे त्यांना गरिबीकडून श्रीमंतीकडे घेऊन जाऊ शकतात. आवश्यक असलेल्या सर्व सुख-सोयी आणि विलासी जीवन जगता येऊ शकते. काही व्यक्ती आयुष्यभर श्रीमंतीत जगतात, असे म्हटले जाते. 3 / 12काही ग्रहांच्या संयोगाने महाभाग्य नामक राजयोग जुळून येतो. हा एक अशा प्रकारचा योग आहे, जो लोकांना जीवनात उच्च पदे मिळविण्यास मदत करतो. आनंद, समृद्धी, भौतिक सुखे आणि भाग्याची भक्कम साथ नशिबाने प्राप्त होते, असे सांगितले जाते. 4 / 12ज्या लोकांच्या कुंडलीत महाभाग्य राजयोग असतो ते काहीही न करता जीवनात सर्वकाही साध्य करतात. महाभाग्य राजयोग हा सर्व राजयोगांपैकी सर्वांत महत्त्वाचा आहे. हा योग व्यक्तीच्या भाग्याची संपूर्ण माहिती प्रदान करतो. म्हणूनच याला महाभाग्य राजयोग म्हणतात.5 / 12एखाद्या व्यक्तीचा लग्न स्थानी सूर्य आणि चंद्र विषम राशीत असताना कुंडलीत महाभाग्य राजयोग तयार होतो. हा योग पुरुष आणि स्त्रियांसाठी वेगवेगळ्या प्रभावात असतो. या राजयोगाचे फल पाहण्यासाठी जन्माचा काळ विचारात घेतला जातो.6 / 12पुरुषाच्या कुंडलीत लग्न स्थानी सूर्य किंवा चंद्र विषम राशीत असतील तर महाभाग्य राजयोग तयार होतो. विषम राशी म्हणजे मेष, मिथुन, सिंह, तूळ, धनु आणि कुंभ. महिलांच्या कुंडलीत लग्न स्थानी सूर्य आणि चंद्र सम राशीत असतील जसे की, वृषभ, कर्क, कन्या, वृश्चिक, मकर आणि मीन, तर महाभाग्य राजयोग तयार होतो.7 / 12महाभाग्य राजयोग ज्या व्यक्तींच्या कुंडलीत असतो, त्यांना सर्व प्रकारचे आनंद अनुभवायला मिळते. ते खूप लोकप्रिय असतात. उदार स्वभाव आणि स्वच्छ चारित्र्य आहे. या राजयोगाच्या प्रभावाखाली लोक राजांसारखे जगू शकतात. असे लोक वर्तनात कुशल असतात ज्यामुळे त्यांना नेहमीच प्रसिद्धी मिळते. 8 / 12ज्या महिलांच्या कुंडलीत हा योग असतो, त्या खूप श्रीमंत होऊ शकतात, असे म्हटले जाते. जर एखाद्या महिलेच्या कुंडलीत महाभाग्य राजयोग असेल तर अशा महिला खूप भाग्यवान मानल्या जातात. या राजयोगाच्या महिलांना आयुष्यभर सर्व सुख मिळते.9 / 12अशा व्यक्ती खूप श्रीमंत, शक्तिशाली आणि प्रभावशील असतात. त्यांचे शत्रूही त्यांच्यावर मात करू शकत नाहीत. अशा व्यक्ती राजकारणात उच्च पदांवर पोहोचतात आणि समाजात लोकप्रिय असतात. त्यांना खूप आदर मिळतो. या व्यक्तींकडे दूरदृष्टी चांगली असती. 10 / 12कुंडलीत महाभाग्य योग असेल, तर अशा लोकांना समाजात आणि कुटुंबात आदर, मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळते. भौतिक सुख-सोयी मिळतात. उच्च विचार करण्याची क्षमता असते. जीवनात भरपूर संपत्ती मिळते. 11 / 12ज्या महिलांच्या कुंडलीत हा राजयोग असतो त्या भाग्यवान, सद्गुणी आणि सुसंस्कृत असतात. त्या खूप भाग्यवान असतात. त्या त्यांच्या पती आणि सासू-सासऱ्यांसाठी भाग्यवान असतात, असे म्हटले जाते. 12 / 12- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.