तुमच्या तळहातावर कशी आहे जीवनरेषा? नशिबाची जबरदस्त साथ अन् भाग्योदयाचे शुभयोग
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 19:57 IST
1 / 6हस्तरेषाशास्त्रानुसार, तळहातावर असलेल्या सर्व रेषा वेगवेगळ्या असतात आणि त्या सर्वांचे अर्थ, फायदे आणि तोटे वेगवेगळे असतात. तळहातातील सर्वात प्रमुख रेषा म्हणजे जीवनरेषा. ही रेषा अंगठा आणि तर्जनीच्या खालून सुरू होते आणि वर्तुळाच्या आकारात मनगटापर्यंत पसरते. कोणाकोणाच्या हातात दोन आयुष्य रेषा सापडतात. या रेषेला जीवनरेषा देखील म्हणतात कारण ती एखाद्या व्यक्तीचे जीवन, आरोग्य, वागणूक आणि जीवन शक्तीबद्दल सांगते. जीवनरेषा कशाप्रकारे माणसाला भाग्यवान बनवते ते जाणून घेऊया.2 / 6ज्या व्यक्तीच्या हातावरील जीवन रेषा जाड असते, तो खूप शक्तिशाली असतो. त्यांना समाजात खूप सन्मान मिळतो आणि ते मुख्यतः खेळाशी संबंधित बाबींमध्ये भाग घेतात. त्याच वेळी, ज्यांच्या तळहातावर लहान जीवनरेषा असते, ते खूप लाजाळू असतात. यामुळे लोक नेहमीच त्यांच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात.3 / 6जर एखाद्या व्यक्तीच्या तळहातावरची जीवनरेषा स्पष्ट, खोल आणि अखंड असेल तर ती व्यक्ती खूप भाग्यवान असते. अशा व्यक्ती प्रेमळ आणि दयाळू असतात. अशा व्यक्तींचे आरोग्य नेहमीच चांगले राहते. यामुळेच त्यांना आपलं ध्येय गाठण्यातही मदत मिळते. तर दुसरीकडे, ज्यांच्या हातात जीवनरेषा अस्पष्ट आणि कट असलेली असते तितके त्यांचे जीवन अधिक दु:खद असल्याचं म्हटलं जातं.4 / 6तळहातावर दोन समांतर जीवन रेषा असतील तर अशा व्यक्तीला खूप भाग्यवान मानले जाते. अशा व्यक्तीला प्रत्येक कामात घरच्यांचा पूर्ण पाठिंबा मिळतो आणि त्यांचे भविष्य नेहमीच चांगले असते. समांतरपणे दोन जीवनरेषा असल्याने व्यक्तीमध्ये पुष्कळ विश्वास निर्माण होतो आणि तो प्रत्येक परिस्थितीत पुढे जात असतो. अशा व्यक्ती ज्या क्षेत्रात पुढे जातात, त्या क्षेत्रात त्यांना यश मिळते.5 / 6जर व्यक्तीच्या तळहातावर गुरू पर्वताच्या खाली जीवनरेषा आणि मस्तिष्क रेषा पूर्णत: एकत्र येत असेल तर ते खूप चांगले मानले जाते. अशी व्यक्ती खूप मेहनती असते आणि सतत मेहनतीच्या जोरावर पुढे जाते. त्याच वेळी, ते त्यांचे काम नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करतात आणि पूर्णपणे सतर्क असतात. अशी लोकं जे काम हाती घेतात ती ते पूर्ण करतात.6 / 6जर जीवन रेषेतून एखादा फाटा फुटत असेल आणि तो शनि पर्वताच्या खालच्या भागात म्हणजेच मध्य बोटापर्यंत पोहोचत असेल तर असा माणूस खूप श्रीमंत असतो. असे लोक खूप उत्साही आणि त्यांच्या कामासाठी पूर्णपणे समर्पित असतात. आपल्या कुटुंबासोबतच असे लोक समाजाचीही काळजी घेतात आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतात. (टीप - सदर माहिती सामान्य गृहितकांवर आधारित असून यासंदर्भात तज्ज्ञ जाणकार व्यक्तींशी सल्लामसलत करणे अतिशय उपयुक्त ठरू शकेल.)