शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Horoscope March 2023: मार्चमध्ये चार ग्रहांची स्थिती बदलणार; 'या' पाच राशींसाठी सुवर्णकाळ, होणार भरभराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 17:17 IST

1 / 7
मार्च महिन्यामध्ये ४ प्रमुख ग्रहांच्या स्थितीत बदल होत आहे. या महिन्यात मंगळ मिथुन राशीत तर शुक्र मेष राशीत प्रवेश करेल. १५ मार्च रोजी सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. तर १६ मार्च रोजी बुधदेखील मीन राशीत जाऊन बुधादित्य योग तयार करेल.
2 / 7
३१ मार्च रोजी बुध पुन्हा मीन राशीतून मेष राशीत जाईल. ग्रहांच्या या राशीबदलामुळे पाच राशींच्या लोकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत वृषभ राशीसह ५ राशींसाठी मार्च महिना खूप फायदेशीर राहू शकतो.
3 / 7
वृषभ - या कालावधीत वृषभ राशीच्या लोकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होण्यासोबतच त्यांना त्यांच्या करिअरशी संबंधित उत्कृष्ट संधी मिळू शकतात. तुम्ही सध्या जिथे काम करत आहात, तिथे कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण असेल आणि तुमच्या कामगिरीला नवी ओळख मिळण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्हाला पगारवाढीबाबत काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकेल.
4 / 7
मिथुन - या महिन्यात मंगळ तुमच्या राशीत प्रवेश करेल. त्याच्या प्रभावाने तुमचे शौर्य आणि पराक्रम वाढेल. तुमची निर्णय घेण्याची क्षमताही वाढेल आणि यावेळी घेतलेले करिअरचे निर्णय भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. चांगल्या संधी प्राप्त करण्यासाठी तुमच्या मित्रांचीही तुम्हाला मदत मिळू शकते. त्यांच्या संपर्कातून तुम्हाला विशेष लाभही होऊ शकतो.
5 / 7
कर्क - कर्क राशीच्या लोकांसाठी मार्च महिना करिअरच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असणार आहे. या महिन्यात नोकरदार लोकांचीही प्रगती होऊ शकेल आणि यासोबतच व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफाही मिळण्याची शक्यता आहे. परदेशात नोकरी करणाऱ्या तुमच्या नातेवाईकांच्या मदतीने तुम्हाला उदरनिर्वाहाच्या दृष्टीने चांगल्या संधी मिळू शकतात. व्यावसायिक महिलांसाठी हा महिना विशेष फायदेशीर ठरू शकतो. बऱ्याच काळापासून तुम्ही ज्याची वाट पाहत होता अशा करिअरच्या संधीही तुम्हाला मिळू शकतात.
6 / 7
तूळ - तूळ राशीच्या लोकांना ग्रहांच्या राशी बदलाचा विशेष लाभ होणार आहे. विशेषत: या राशीच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा राहील आणि कामाच्या ठिकाणी उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मान होण्याची शक्यता आहे. नोकरीत बढतीसोबतच चांगल्या कामासाठी तुमचं कौतुक केले जाऊ शकते. यावेळी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या चांगल्या संधीही मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गातील लोकांनी कोणताही नवीन करार करण्यापूर्वी नीट विचार करावा.
7 / 7
मीन - मीन राशीच्या लोकांसाठी हा महिना आर्थिक बाबतीत विशेष फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. या तुमच्या राशीत बुध आणि सूर्याच्या संयोगामुळे बुधादित्य योग तयार होईल. या योगाच्या प्रभावाने तुमच्या पगारात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. मीन राशीच्या लोकांना या महिन्यात नोकरीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. दुसरीकडे, जे व्यवसायात गुंतलेले आहेत ते त्यात गुंतवणूक करण्याचा आणि पुढे नेण्याचा विचार करू शकतात.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य