शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gurupushyamrut Yoga 2024: दत्तगुरु व लक्ष्मीचा मिळेल कृपाशिर्वाद; सहा राशींना होईल धनवृद्धीचा लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 11:25 IST

1 / 7
आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा योग सर्वात शुभ योग म्हणून ओळखला जातो. गुरुवार दत्तगुरूंचा आणि गुरुपुष्यामृत योग माता लक्ष्मीची कृपा मिळवून देणारा, त्यामुळे हा योग सहा राशींसाठी अधिक लाभदायी ठरणार आहे.
2 / 7
ठरवलेली कामे होतील. तसेच जुनी येणी वसूल होतील. गुरुपुष्यामृत योगावर नवीन वस्तूंची खरेदी कराल. या वस्तू दीर्घकाळ लाभ देतील. दत्त कृपेने मन शांत राहील आणि नवीन कामाची सुरुवात कराल.
3 / 7
गुरुपुष्यामृत योगावर नवीन संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे, जिची तुम्ही दीर्घ काळापासून वाट बघत होतात. ती संधी ओळखा आणि संधीचे सोने करा. नव्या लोकांशी भेटी गाठी होतील व त्या लाभदायक ठरतील.
4 / 7
गुरु पुष्यामृतावर सोने खरेदी करण्याचा प्रघात आहे. तुम्हीसुद्धा या योगावर एक ग्राम का होईना सोने खरेदी अवश्य करा. या योगावर केलेली खरेदी फलदायी ठरते, वृद्धिंन्गत होते. अशी भरभराट व्हावी म्हणून चांगल्या वस्तूची खरेदी जरूर करा!
5 / 7
कन्या राशीसाठी हा योग आनंदादायी ठरेल. आनंद वार्ता समजतील. दत्त कृपेने जुने वाद संपुष्टात येतील. हितशत्रू माघार घेतील. वाहन, यंत्र किंवा अन्य मोठ्या गोष्टींच्या खरेदीसाठी हा दिवस लाभदायी ठरेल.
6 / 7
धनु राशीला गुरु पुष्यामृत योगावर धनलाभ होण्याचे संकेत आहेत. हा दिवस त्यांच्यासाठी शुभवार्ता आणणाराही ठरू शकेल. आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारी दूर होतील. लक्ष्मीचे स्तोत्र पठण तुम्हाला इच्छित लाभ करून देईल.
7 / 7
मकर राशीची थांबलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. यशाचे नवे मार्ग खुले होतील. दत्त उपासनेचा लाभ होईल. या योगावर केलेली कोणतीही खरेदी फायदेशीर ठरेल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य