गुरु गोचर: १० राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; लॉटरी-शेअर बाजारात फायदा, गुंतवणुकीतून नफा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 10:03 IST
1 / 13नवग्रहांचा गुरु बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रह सुमारे एक वर्ष एका राशीत विराजमान असतो. आताच्या घडीला गुरु ग्रह वृषभ राशीत विराजमान आहे. गुरु हा ज्ञान, सुख व स्वराचा कारक ग्रह आहे. सन २०२५ मध्ये गुरुचे गोचर होणार आहे. मे महिन्यात गुरु मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. तत्पूर्वी गुरुचे एप्रिल महिन्यात नक्षत्र गोचर होणार आहे. 2 / 13एप्रिल महिन्यात गुरु ग्रहाचे नक्षत्र गोचर होणार आहे. १० एप्रिल रोजी गुरु मृग नक्षत्रात प्रवेश करणार आहे. तर मे महिन्यात गुरु ग्रह वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. गुरुचे गोचर अतिशय महत्त्वाचे मानले जाते. केवळ राशींवर नाही, तर देश-दुनियेवर याचा मोठा प्रभाव पाहायला मिळतो.3 / 13१५ मे २०२५ रोजी गुरु शुक्राचे स्वामित्व असलेल्या वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करत आहे. एप्रिलमध्ये होत असलेले गुरुचे नक्षत्र गोचर आणि मे महिन्यात होत असलेले राशी परिवर्तन अनेक राशींना गुरुबळ देणारे, गुरुकृपा करणारे तसेच सकारात्मक अनुकूल ठरू शकते, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...4 / 13मेष: गुरु गोचर शुभ आणि फलदायी ठरू शकते. सकारात्मक ऊर्जा जीवनाच्या विविध क्षेत्रात नवीन संधी आणि यश देईल. कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांतता राहील. गुंतवणुकीतून नफा मिळवण्याची संधी मिळेल. देशात आणि परदेशात प्रवास करू शकता. बेरोजगार आहेत त्यांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात.5 / 13वृषभ: खूप फायदे मिळू शकतात. वडिलोपार्जित मालमत्तेत लाभ मिळू शकतो. वडिलोपार्जित व्यवसाय असेल तर बरेच फायदे मिळू शकतात. विरोधकांचा पराभव होईल. कल अध्यात्माकडे अधिक असेल. धार्मिक बाबींमध्ये सक्रियपणे सहभागी व्हाल. कुटुंबातील सदस्यांसोबत सुसंवादाने राहाल. कामाच्या ठिकाणी स्थान मजबूत होईल. यश-प्रगतीच्या संधी उपलब्ध होऊ शकतील.6 / 13मिथुन: गुरु गोचराने आत्मविश्वास वाढलेला दिसेल. प्रलंबित कामे पूर्ण करता येऊ शकतील. नोकरी करणाऱ्यांना लाभ होण्याची शक्यता आहे. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन शांततेत जाऊ शकेल. जोडीदाराच्या प्रगतीची शक्यता आहे. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होईल. समाजातही आदर वाढेल. नातेसंबंध अधिक दृढ होतील. यासोबतच कौटुंबिक शांतीही राहील.7 / 13कर्क: इच्छा पूर्ण होऊ शकतात. नोकरी करत असाल तर भरपूर फायदे मिळू शकतात. गुंतवणूक किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय फायदेशीर ठरतील. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. या काळात व्यापाऱ्यांना नवीन व्यवसायिक सौद्यांचा फायदा होईल. व्यवसाय वाढू शकतो. या काळात जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे.8 / 13सिंह: गुरु गोचर अनुकूल ठरू शकते. करिअर आणि व्यवसायाच्या क्षेत्रात यश मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. आर्थिकदृष्ट्या हा काळ खूप चांगला जाईल. गुंतवणूक किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय फायदेशीर ठरतील. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता असेल. शेअर बाजारआणि लॉटरीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ते करू शकता. नफ्याची शक्यता आहे.9 / 13कन्या: आयुष्यात तुम्हाला अनुकूल बदल दिसतील. मोठे यश मिळवू शकाल. उत्पन्न लक्षणीय वाढण्याची शक्यता आहे. या काळात लक्षणीय बचत करू शकाल. या काळात नफा मिळविण्याच्या अनेक चांगल्या संधी मिळतील. एकंदरीत, या काळात खूप उत्साह वाटेल.10 / 13वृश्चिक: आदर आणि प्रतिष्ठा मिळू शकते. व्यावसायिकांना नवीन व्यवसाय करारांचा फायदा होईल. जुन्या कर्जातून मुक्तता मिळू शकेल. नवीन ऊर्जा आणि उत्साहाने भरलेले असाल, जे ध्येयांकडे वाटचाल करण्यास मदत करेल. तसेच इच्छा पूर्ण होतील. पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकाल.11 / 13धनु: वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्या संपू शकतात. वैवाहिक जीवनात गोडवा कायम राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. व्यवसायात नफ्याच्या अनेक शक्यता निर्माण होत आहेत. लक्षणीय यश मिळू शकते. उत्पन्नात झपाट्याने वाढ होणार आहे. निर्णय घेण्याची क्षमताही चांगली राहणार आहे. कल अध्यात्माकडे असेल. आत्मपरीक्षण कराल. काही चांगली बातमी मिळू शकते.12 / 13मकर: गुरु गोचर सकारात्मक ठरू शकते. कामात आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. नवीन व्यवसायिक करारांमुळे व्यापाऱ्यांना फायदा होईल. जुन्या कर्जातून मुक्तता मिळू शकेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि पगारवाढ मिळू शकते. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांनाही नोकरी मिळण्याची शक्यता आहे.13 / 13मीन: सभोवतालची प्रत्येक गोष्ट सोपी होत असल्याचा अनुभव येऊ शकेल. जे व्यवसाय करतात त्यांना खूप चांगले पैसे मिळतील. उत्पन्नात अचानक वाढ होईल. यासोबतच खर्चातही वाढ होईल. चांगल्या उत्पन्नामुळे कोणत्याही आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागणार नाही. या काळात जोडीदारही प्रत्येक पावलावर साथ देईल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.