Mercury Retrograde 2022 positive Impact: बुध होणार वक्री, सप्टेंबर महिन्यात या राशींच्या लोकांचं करिअर चमकणार, वाढेल कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 19:12 IST
1 / 7बुद्धी, विद्या आणि धन प्रदान करणारा ग्रह बुध हा वक्री होणार असून त्या फायदा काही राशींच्या लोकांना होणार आहे. १० सप्टेंबर रोजी बुध वक्री होणार असून यामुळे काही राशींच्या लोकांना करिअरमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. यादरम्यान जर तुम्ही नव्या नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला यश मिळून शकतं. 2 / 7शनिवार १० सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजून ४२ मिनिटांनी बुध कन्या राशीत वक्री होतील. २ ऑक्टोबर पर्यंत बुध या राशीत वक्री राहणार असून नंतर बुध कन्या राशीत मार्गस्थ होईल. या कालावधीत काही राशीच्या लोकांना करिअर, आर्थिक बाबतीत चांगली गोष्ट कानी पडण्याची शक्यता आहे. पाहुया कोणत्या आहेत या राशी.3 / 7वृषभ - वृषभ राशीच्या लोकांसाठी बुधाची वक्री चाल शुभ परिणाम देणारी मानली जाते. त्याच्या प्रभावाने, तुमची नेतृत्व गुणवत्ता आणखी वाढेल आणि तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक प्रभावीपणे बोलू शकाल. करिअर आणि पैशाच्या बाबतीत तुमचे नशीब यावेळी चमकण्याची शक्यता आहे. त्याच वेळी मित्र आणि जवळच्या लोकांशी तुमचे संबंध सुधारतील. तुमचा बँक बॅलन्सही वाढण्याची शक्यता आहे. या कालावधीत शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवणं टाळा. प्रेमी जोडप्यांनीही आपल्या नात्याबद्दल थोडं सावध राहावं. वादविवाद टाळावेत. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम आहे. त्यांना स्पर्धेतही यश मिळण्याची शक्यता आहे.4 / 7मिथुन - हा कालावधी तुमच्यासाठी उत्तम ठरण्याती शक्यता आहे. करिअरमध्ये तुम्हाला नव्या संधी मिळू शकतील. तसंच सुख सुविधांमध्येही वृद्धी होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीतही हा कालावधी चांगला ठरण्याची शक्यता असून धनलाभ संभवतो. महत्त्वाच्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणीही दूर होतील.5 / 7कन्या - हा कालावधी कन्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात निरनिराळ्या प्रकारचे अनुभव मिळतील. वैयक्तिक आयुष्यातही प्रभाव आणि वर्चस्व वाढेल. या कालावधीत शत्रूंपासून सावध राहण्याची गरज आहे. जोडीदारासोबतही वाद टाळा. माध्यम क्षेत्रांशी निगडित असलेल्या लोकांसाठी हा कालावधी उत्तम ठरू शकतो. करिअरमध्ये तुम्ही मोठा निर्णयही घेऊ शकता.6 / 7धनु - या कालावधीत सहकाऱ्यांसोबत तुमचे संबंध उत्तम होतील. मेहनतीचे परिणामही दिसून येतील. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठीही हा कालावधी उत्तम ठरू शकतो. कुटुंबातील वादही कमी होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या शोधात असाल तर तुम्हाला जोडीदारही मिळू शकतो.7 / 7मकर - मकर राशीच्या लोकांसाठीहा कालावधी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. कुटुंबातही आनंदाचं वातावरण राहिल. या कालावधीत प्रवासाचाही कार्यक्रम ठरू शकतो. सरकारी क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांसाठीही हा कालावधी उत्तम ठरू शकतो. तुम्हाला अपेक्षित गोष्टी या कालावधीत घडू शकतात. प्रॉपर्टीशी निगडित अडकलेली कामेही या कालावधीत मार्गी निघण्याची शक्यता आहे.