गणेश चतुर्थी: ७ राशी बाप्पाला अतिप्रिय, कधीही विघ्न येत नाही; सुख काळ, छप्परफाड लाभ-कृपा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 16:54 IST
1 / 11Ganesh Chaturthi 2024: शनिवार, ०७ सप्टेंबर २०२४ रोजी गणेश चतुर्थी आहे. या दिवशी घरोघरी, मंडळांमध्ये गणरायाची स्थापना होऊन पुढे १० दिवस गणेशोत्सव साजरा केला जाईल. गणेश उपासना केल्याने शक्ती, बुद्धी आणि ज्ञानाचा आशीर्वाद मिळतो. सुखकर्ता, विघ्नहर्ता बाप्पाच्या आशीर्वादाने सर्व समस्या दूर होतात, असे मानले जाते. 2 / 11कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात प्रथमेश असलेल्या गणपती पूजनाने होते. गणेश चतुर्थीला गणपतीची पूजा केल्याने भक्ताला विशेष फल प्राप्त होते. मनोकामना पूर्ण होऊ शकतात. गणरायाच्या अपार कृपेचा लाभ प्राप्त होऊ शकतो, असे सांगितले जाते. 3 / 11ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशी गणेशाला सर्वात प्रिय असतात. बाप्पा केवळ प्रत्येक संकटातून त्यांचे रक्षण करत नाही तर या राशीच्या लोकांचे जीवन शुभ योगाने सुख आणि समृद्धीने भरते. घरात ऐश्वर्य वाढते. संपत्तीत अपार वाढ होते. गणेशाला कोणत्या राशी प्रिय आहेत, जाणून घेऊया...4 / 11मेष: या राशीचा स्वामी मंगळ आहे. हे लोक प्रत्येक कामात वेगवान आणि कुशल असतात. गणेशाची ही आवडती रास मानली जाते. या राशीच्या लोकांवर सदैव आशीर्वाद राहतो. हे लोक बुद्धिमानही असतात. बाप्पाच्या कृपेने या राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळते. बाप्पा सर्व कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय करून घेतात. बाप्पाच्या कृपेने आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. सदैव सुखी आणि समृद्ध राहतात. गणेशाच्या आशीर्वादाने करिअर आणि व्यवसायात खूप प्रगती होते.5 / 11मिथुन: या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. बुध ग्रह बुद्धिमत्ता, वाणी, व्यवसाय आणि व्यापाराचा कारक मानला जातो. ज्या लोकांच्या कुंडलीत बुध ग्रह बलवान असतो, ते खूप बुद्धिमान असतात. ही रास भगवान गणेशाला प्रिय आहे, या लोकांवर बाप्पा खूप कृपा करतात.गणेश इच्छा पूर्ण करतात. करिअरमध्ये प्रगती आणि शुभ लाभ देतात. संकटे दूर करतात. रक्षण करतात. समाजात आणि कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळतो. व्यवसायात भरपूर यश मिळते. सुख-समृद्धीसह संपत्ती, ऐश्वर्याचा लाभ होतो, असे सांगितले जाते. 6 / 11कर्क: या राशीचा स्वामी चंद्र आहे. या लोकांना नेहमी चंद्र देवाचा आशीर्वाद असतो. गणेशाची नियमित पूजा केल्यास त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू येऊ शकतात. भगवान गणेशाच्या आशीर्वादाने बुद्धिमत्ता आणि कौशल्ये विकसित होण्याची अधिक शक्यता असते. या राशींवर गणरायाची अपार कृपा असते, अशी मान्यता आहे.7 / 11कन्या: या राशीचा स्वामी बुध आहे. गणेश चतुर्थीला या राशीच्या लोकांना गणपतीचा विशेष आशीर्वाद मिळू शकतो. या दिवशी गणेशाची पूजा करावी. या दिवशी जर भक्ताने श्रीगणेशाची मनापासून पूजा केली तर, बाप्पा सर्व संकट दूर करतात. याशिवाय जीवनात सदैव समृद्धी, सुख, शांती आणि ऐश्वर्य नांदू शकते, असे म्हणतात.8 / 11वृश्चिक: या राशीचा स्वामी मंगळ आहे. गणेशाची ही आवडती रास मानली जाते. या राशीचे लोक स्वभावाने आक्रमक असतात, अशा परिस्थितीत गणेश संरक्षण करतात. गणेश कृपेने संकटे दूर होतात. बाप्पाचा वरदहस्त सदैव असतो. अडकलेली कामे बाप्पाच्या आशीर्वादाने मार्गी लागतात9 / 11मकर: या राशीचा स्वामी शनि देव आहे. शनी ग्रहाला नवग्रहांत न्यायाधीशाचे स्थान आहे. तो माणसाला त्याच्या कर्माच्या आधारे फळ देतो. या राशीवर गणेशाची कृपा राहते, ज्यामुळे सर्व समस्या दूर होतात. बाप्पाच्या आशीर्वादाने व्यवसाय आणि शैक्षणिक क्षेत्रात यश मिळते. गणपतीचा आशीर्वाद सदैव राहतो. बाप्पा आयुष्यात कधीही आर्थिक संकट येऊ देत नाहीत. आयुष्यात जे काही साध्य करण्याचा प्रयत्न करतात, बाप्पा त्यांना ती गोष्ट साध्य करण्यास मदत करतात. प्रत्येक कार्यात यश मिळवून देतात.10 / 11कुंभ: या राशीचा स्वामी शनि देव आहे. शनी ग्रहाला नवग्रहांत न्यायाधीशाचे स्थान आहे. ही रास गणपतीची सर्वांत प्रिय रास आहे. गणेश नेहमी सुखी आणि समृद्ध ठेवतात. प्रत्येक संकटापासून रक्षण करतात. करिअरमध्ये उत्तम उंची गाठतात. व्यवसायातही चांगली कमाई करतात. नेहमी इतरांचे भले करण्याचा स्वभावामुळे बाप्पाचा शुभाशीर्वाद सदैव राहतो.11 / 11- सदर दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.