गणेश चतुर्थी: तुमच्या राशीनुसार दाखवा बाप्पाला नैवेद्य; इच्छा होतील पूर्ण, गणराया शुभ करेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 17:37 IST
1 / 15Ganesh Chaturthi 2024: शनिवार, ०७ सप्टेंबर २०२४ रोजी गणेश चतुर्थी आहे. या दिवशी घरोघरी, मंडळांमध्ये गणरायाची स्थापना होऊन पुढे १० दिवस गणेशोत्सव साजरा केला जाईल. गणेश चतुर्थीला गणपतीची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे. 2 / 15गणपती पूजनासह गणपतीला आवडत्या वस्तू अर्पण केल्या जातात. तसेच गणरायाच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. जास्वंद आणि दुर्वा या आवर्जून अर्पण केल्या जातात. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपतीची पूजा पूर्ण होत नाही. केवळ एक दुर्वा वाहिली, तरी पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. 3 / 15ज्योतिषशास्त्रानुसार, गणपतीला तुमच्या राशीनुसार नैवेद्य दाखवणे लाभदायक मानले गेले आहे. असे केल्याने गणपतीची अपार कृपा, शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते. गणपतीच्या कृपेचा विशेष लाभ प्राप्त होण्यासाठी कोणत्या राशींच्या लोकांनी काय नैवेद्य दाखवावा, ते जाणून घेऊया...4 / 15मेष: गगणेश चतुर्थीसह गणेशोत्सवात या राशीच्या लोकांनी गणेशाची पूजा करताना लाडू अर्पण करावेत.5 / 15वृषभ: गणेश चतुर्थीसह गणेशोत्सवात या राशीच्या लोकांनी गजाननाला मोदक अर्पण करावेत.6 / 15मिथुन: गणेश चतुर्थीसह गणेशोत्सवात या राशीच्या लोकांनी बाप्पाला मोदक अर्पण करावेत.7 / 15कर्क: गणेश चतुर्थीसह गणेशोत्सवात या राशीच्या लोकांनी गणपती पूजनात मोतीचूर लाडू अर्पण करावेत.8 / 15सिंह: गणेश चतुर्थीसह गणेशोत्सवात या राशीच्या लोकांनी गणरायाला पिवळ्या बुंदीचे लाडू अर्पण करावेत.9 / 15कन्या: गणेश चतुर्थीसह गणेशोत्सवात या राशीच्या लोकांनी बाप्पाला केशरी रंगाचे लाडू अर्पण करावेत.10 / 15तूळ: गणेश चतुर्थीसह गणेशोत्सवात या राशीच्या लोकांनी गणेशाला मोदक आणि रसमलाई अर्पण करणे शुभ मानले गेले आहे.11 / 15वृश्चिक: गणेश चतुर्थीसह गणेशोत्सवात या राशीच्या लोकांनी गणपती पूजनात मोतीचूर लाडू अर्पण करावेत.12 / 15धनु: गणेश चतुर्थीसह गणेशोत्सवात या राशीच्या लोकांनी गणपतीला केशरयुक्त खीर अर्पण करावी.13 / 15मकर: गणेश चतुर्थीसह गणेशोत्सवात या राशीच्या लोकांनी गणपती बाप्पाची आरास अपराजिता फुलांनी करावी. 14 / 15कुंभ: गणेश चतुर्थीसह गणेशोत्सवात या राशीच्या लोकांनी गणरायाला बेसनाचे लाडू अर्पण करावेत.15 / 15मीन: गणेश चतुर्थीसह गणेशोत्सवात या राशीच्या लोकांनी श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.