शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 07:07 IST

1 / 15
नवग्रहांचा गुरू बृहस्पती म्हणजेच गुरू ग्रह आताच्या घडीला कर्क राशीत विराजमान आहे. कर्क रास ही गुरूची उच्च रास मानली जाते. याच राशीत गुरू आता वक्री चलनाने गोचर करणार आहे. अवघ्या काही दिवसांपासून कर्क राशीत विराजमान झालेला गुरू ग्रह ११ नोव्हेंबर रोजी वक्री होणार आहे.
2 / 15
गुरू ग्रह कर्क राशीत वक्री होणार असून, काही दिवसांनी वक्री चलनाने पुन्हा एकदा मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. काही महिने मिथुन राशीत गुरू असेल. परंतु, त्यानंतर गुरू पुन्हा एकदा मार्गी होऊन कर्क राशीत प्रवेश करेल. सध्या गुरू अतिचारी गतीने गोचर करत आहे.
3 / 15
गजकेसरी योगात गुरू ग्रह वक्री होणार असून, गुरू ग्रहाच्या वक्री होण्याचा अनेक राशींना लाभ होऊ शकेल, असे म्हटले जात आहे. कुटुंब, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, करिअर, व्यापार, आर्थिक आघाडीवर कशा प्रकारे गुरू वक्री झाल्याचा प्रभाव पडू शकेल? जाणून घेऊया...
4 / 15
वृषभ: करिअरमध्ये एक महत्त्वाचा टप्पा येईल. प्रलंबित पदोन्नती मिळू शकते. नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. जुने अडथळे, समस्या आता दूर होऊ शकतील. व्यावसायिकांसाठी, हा विस्ताराचा काळ आहे. कौटुंबिक जीवनात शांती नांदेल. नशिबाची भक्कम साथ लाभू शकेल. अध्यात्माकडे कल राहील. व्यापारात बरकत होऊ शकेल. नवीन ऑर्डर्स मिळू शकतील.
5 / 15
मिथुन: हा काळ आर्थिकदृष्ट्या अनुकूल ठरेल. अडकलेला निधी, पैसा परत मिळू शकेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. कुटुंबातील दीर्घकाळापासूनचे संघर्ष आणि तणाव कमी होतील. घरात सुसंवादी आणि शांत वातावरण निर्माण होईल. सामाजिक दर्जा वाढेल आणि कामाचे कौतुक होईल. शत्रू मागे हटतील. उत्साह वाढेल.
6 / 15
कर्क: एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. या काळात आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. बौद्धिक क्षमतेने आणि कार्यक्षमतेने कामे पूर्ण कराल. घर, वाहन खरेदी करण्यासाठी किंवा कौटुंबिक संबंध मजबूत करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. विवाहित व्यक्ती आनंदी वैवाहिक जीवनाचा आनंद घेतील. जोडीदारालाही फायदा होऊ शकतो. विवाहेच्छुकांना चांगली स्थळे येऊ शकतील.
7 / 15
कन्या: आर्थिकदृष्ट्या हा काळ अत्यंत शुभ राहील. अडकलेले पैसे परत मिळतील. गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळेल. कला, माध्यम किंवा फॅशन क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ लाभदायक असेल. वैवाहिक मतभेद दूर होतील. व्यवसाय, नोकरीत फायदेशीर परिस्थिती उद्भवू शकते. कुटुंब आणि मुलांबद्दलच्या चिंता कमी होतील. व्यक्तिमत्त्वाचे आणि कामाच्या नीतीचे कौतुक केले जाईल. प्रतिष्ठा वाढेल. विरोधक आणि शत्रू पराभूत होतील.
8 / 15
तूळ: या काळात बेरोजगार व्यक्तींना नोकरी मिळू शकते. या काळात लोकप्रिय व्हाल. लेखन, अध्यापन किंवा माध्यमांमध्ये गुंतलेल्यांना विशेष फायदे मिळू शकतात. याव्यतिरिक्त, आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वाढेल आणि सामाजिक आदर मिळेल. करिअर नवीन उंचीवर पोहोचेल. नवीन प्रकल्प, पदोन्नती किंवा एखाद्या मोठ्या कामाची जबाबदारी दिली जाऊ शकते.
9 / 15
वृश्चिक: नशिबाची भक्कम साथ लाभू शकेल. परराष्ट्र व्यवहारांशी संबंधित एखाद्या कामावर काम करू शकाल. हा काळ विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अनुकूल असेल. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे लवकर पूर्ण होतील. अध्यात्माकडे कल वाढू शकेल. करिअरमध्ये प्रगतीसाठी नवीन संधी निर्माण होऊ शकतात. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. कठोर परिश्रम आणि क्षमता समाजात आदर आणि मान-सन्मान वाढवतील.
10 / 15
धनु: सुखसोयी वाढतील. कुटुंबाची काळजी वाटत असली तरी, मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. या काळात गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकेल. या काळात केलेले कठोर परिश्रम यशाचा मार्ग प्रशस्त करू शकतील. कामाचे आधीच काळजीपूर्वक नियोजन करा. वैयक्तिक आघाडीवर, थोडे व्यावहारिक राहण्याची आवश्यकता आहे.
11 / 15
मकर: जीवनात आनंद येऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो. नवीन संधी मिळू शकतात. पदोन्नतीसोबतच आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढू शकते. दीर्घकालीन समस्या किंवा अडथळे दूर होऊ शकतात.
12 / 15
कुंभ: आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. विशेषतः भागीदारी उपक्रमांमध्ये लाभ होऊ शकेल. सामाजिक मान-सन्मान आणि आदर वाढण्याची शक्यता आहे.
13 / 15
मीन: जुन्या रखडलेल्या योजनांना पुन्हा गती मिळेल. नशीब, भाग्याची भक्कम साथ लाभू शकेल. करिअरचे ठोस निर्णय घेण्याची ही योग्य वेळ आहे. नवीन संधी उपलब्ध होतील आणि नेतृत्व कौशल्य सुधारेल. स्पर्धा परीक्षांमधून विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकेल. आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारेल. उत्पन्न आणि नफ्यात लक्षणीय वाढ दिसून येईल. खर्च नियंत्रणात राहतील. चिंता आणि मानसिक ताण कमी होईल. सकारात्मक वाटेल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकेल. प्रगतीचे मार्ग खुले होतील. समाजात आदर वाढेल.
14 / 15
नोव्हेंबर महिन्यात बुध ग्रही वक्री होत असून, शनि ग्रह मीन राशीत मार्गी होणार आहे. शनिचे मार्गी होणे शुभ मानले जात असून, याचा सकारात्मक परिणाम राशींसह देश-दुनियेवर होताना दिसू शकतो, असे म्हटले जात आहे.
15 / 15
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यspiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक