२०२४ चे पहिले सूर्यग्रहण: ३ राशींसाठी लाभदायक, ३ राशींना तापदायक; पाहा, कसा असेल प्रभाव?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 09:00 IST
1 / 10First Solar Eclipse 2024: मराठी नववर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. मराठी वर्षाच्या अखेरीस येणाऱ्या होळी या मोठ्या सणाला यंदाचे पहिले चंद्रग्रहण होते. तर मराठी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सन २०२४ मधील सूर्यग्रहण लागणार आहे. 2 / 10०८ एप्रिल रोजी सूर्यग्रहण आहे. चंद्रग्रहणानंतर लगेचच पंधरा दिवसांच्या अंतराने सूर्यग्रहण येत आहे. फाल्गुन अमावास्येला सूर्यग्रहण लागणार आहे. हे सूर्यग्रहण मीन राशीत लागणार असून, सूर्य आणि राहु मीन राशीत आहेत. विशेष म्हणजे ग्रहणावेळी शुक्रही मीन राशीत असणार आहे.3 / 10सन २०२४ मधील पहिले सूर्यग्रहण खग्रास प्रकारातील असणार आहे. या सूर्यग्रहणाचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव असेल? जाणून घेऊया...4 / 10मेष: शत्रूंवर विजय मिळवाल. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. तब्येत सुधारेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. मात्र, पैशाच्या गुंतवणुकीशी संबंधित कोणताही निर्णय घेऊ नका. व्यवसायात कोणताही मोठा व्यवहार करू नका. परिस्थिती जशी आहे तशी ठेवा.5 / 10मिथुन: कौटुंबिक नात्यात गोडवा वाढेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. आत्मविश्वास वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आर्थिक लाभ होईल.6 / 10कन्या: व्यवसायात काही नुकसान सहन करावे लागू शकते. घरात काही मुद्द्यावरून मोठा गोंधळ होऊ शकतो. नवीन वस्तू खरेदी करणे टाळावे. घर किंवा कारचा कोणताही सौदा करत असाल तर हा निर्णय लांबणीवर टाकावा. करिअरशी संबंधित कोणताही निर्णय न घेणे हिताचे ठरू शकेल.7 / 10वृश्चिक: प्रेम जीवन आणि कौटुंबिक जीवनात मोठा बदल दिसू शकेल. जोडीदार किंवा कुटुंबातील सदस्यांशी मतभेत संभवतात. ऑफिसमध्ये बॉससोबतच्या नात्यात मतभेद वाढू शकतात. परस्पर संघर्षामुळे कामावर परिणाम होऊ शकतो. नवीन नोकरीशी संबंधित कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या.8 / 10धनु: मान-सन्मान वाढेल. नोकरीच्या ठिकाणी लाभ होईल. यश मिळेल. पैशाची आवक होण्याच्या नवीन संधी मिळतील. व्यावसायिकांना फायदा होऊ शकतो. पैशाच्या गुंतवणुकीशी संबंधित कोणताही निर्णय घेऊ नका. मोठे व्यवहार न करणे हिताचे ठरू शकेल.9 / 10कुंभ: करिअरमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कामाचा खूप दबाव असेल. धावपळ करावी लागेल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतो. कुटुंबात मतभेद होऊ शकतात. मित्रांकडून विश्वासघात होऊ शकतो. सावधगिरी बाळगा आणि कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. 10 / 10हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसून वेधादि नियम पाळू नयेत, असे सांगितले जात आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.