शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फेब्रुवारीची सांगता: ५ राशींवर ४ ग्रहांची कृपा, सुख-पैसा वाढेल, मार्चची सुरुवात शुभ होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 15:03 IST

1 / 8
फेब्रुवारी महिन्याची सांगता होत आहे. तसेच काहीच दिवसांनी मार्च महिन्याला प्रारंभ होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात अनेकविध शुभ योग जुळून आले होते. मार्च महिन्यात ५ ग्रहांच्या गोचराने असेच काही शुभ योग पाहायला मिळणार आहेत. शनी उदय आणि राहु-बुधचा युती योग हे मार्च महिन्याचे वैशिष्ट्य ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
2 / 8
आताच्या घडीला कुंभ राशीत सूर्य, बुध आणि शनी यांचा बुधादित्य त्रिग्रही योग जुळून आला आहे. नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला शुक्र ग्रह शनीचे स्वामित्व असलेल्या मकर राशीत विराजमान आहे. यामुळे रुचक योग जुळून येत आहे.
3 / 8
तसेच आगामी काळात सूर्य शतभिषा, मंगळ श्रवण, गुरु भरणी नक्षत्रातील पुढील चरणात गोचर करणार आहेत. एकंदरीत ग्रहमान पाहिल्यास ५ राशीच्या व्यक्तींना फेब्रुवारीची सांगता आणि मार्च महिन्याच्या सुरुवातीचा काळ शुभ लाभदायी ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
4 / 8
मेष: मिळणाऱ्या संधींचा जास्तीत जास्त फायदा घ्या आणि ध्येय साध्य करा. नोकरीशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. कामात येणारे अडथळे दूर होऊ शकतात. आर्थिक योजना तयार करू शकाल. सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिकांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरणार आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहू शकेल. व्यवसाय विस्ताराच्या योजना प्रत्यक्षात येऊ शकतात.
5 / 8
सिंह: नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतील. गुंतवणुकीसाठी सल्ला अवश्य घ्यावा. खर्चाबाबत जागरूक रहा. अनेक शुभ संधी मिळू शकतात. ऊर्जा आणि आत्मविश्वास उंचावेल. लोकप्रियता आणि व्यवसायाची विश्वासार्हताही वाढेल. व्यवसायाशी संबंधित प्रवास यशस्वी होईल. वरिष्ठ कामाचे खूप कौतुक करतील. इतर लोकांसोबत तुमचे संबंधही घट्ट होतील.
6 / 8
वृश्चिक: अनेक शुभ संधी मिळू शकतात. अपेक्षित यश मिळू शकेल. सहकार्य मिळेल. नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना चांगली संधी मिळू शकते. व्यवसायाच्या दृष्टीकोनातूनही चांगला काळ राहील. सासरच्या मंडळींकडून काही विशेष सहकार्य मिळू शकते. काही विशेष यश मिळू शकते.
7 / 8
मकर: आत्मचिंतन, विकास आणि स्थिरतेचा काळ आहे. सकारात्मक कालावधी ठरू शकेल. अनेक इच्छित परिणाम प्राप्त होतील. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. कुटुंबात आनंद आणि समृद्धी दिसेल. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. नोकरदार महिलांचा दर्जा आणि स्थानही वाढेल. लव्ह लाइफ चांगले राहील.
8 / 8
मीन: इच्छा पूर्ण करण्यासाठी नातेवाईक पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य करताना दिसतील. नोकरदारांना पदोन्नती, प्रशंसा आणि पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाशी संबंधित काही फायदेशीर योजनांमध्ये गुंतवणूक करून संधी मिळू शकतात. पैसे कुठेतरी अडकले असतील तर परत मिळू शकतात. वैवाहिक नाते घट्ट होईल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य