February Astro 2025: 'या' पाच राशींना फेब्रुवारी अविस्मरणीय ठरणार; चार ग्रहांचे गोचर राजयोग देणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 15:13 IST
1 / 7ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह संक्रमणाच्या दृष्टीने फेब्रुवारी महिना खूप खास ठरणार आहे. या महिन्यात सूर्य आणि मंगळासह चार ग्रह आपली चाल बदलतील. बुद्धी आणि सिद्धी देणारा बुध ग्रह या महिन्यात कन्या राशीत प्रवेश करणार आहे, त्यामुळे शुभ योग तयार होतील. हे स्थलांतर कसे आणि कधी होणार आहे ते पाहू. 2 / 7४ फेब्रुवारी रोजी गुरू वृषभ राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे अनेक राशींना लाभ होईल. अनेकांच्या जीवनात प्रगती आणि शुभ संधी मिळतील. यानंतर ११ फेब्रुवारीला बुध ग्रह शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करेल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे १२ फेब्रुवारीला सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल. यामुळे कुंभ राशीमध्ये सूर्य, बुध आणि शनि यांचा त्रिग्रही योग तयार होईल. यानंतर मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल. महिन्याच्या शेवटी बुध मीन राशीत प्रवेश करेल आणि कमाईच्या उत्तम संधी निर्माण करेल. आता पाहू हे शुभ फळ कोणत्या राशींना मिळणार आहे ते!3 / 7फेब्रुवारी महिना मेष राशीच्या लोकांसाठी करिअरच्या प्रगतीसाठी नवीन संधी घेऊन येईल. विद्यार्थ्यांसाठी यशाचा काळ सुरु होईल! नोकरदारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी बढती मिळू शकेल. याशिवाय व्यावसायिकांना जबरदस्त आर्थिक लाभ होईल ज्यामुळे भविष्यातील समीकरणे बदलतील. शत्रू माघार घेतील. धार्मिक कार्यात रुची वाढेल. परदेश प्रवासाची संधी चालून येईल. प्रेमविवाहाचे योग निर्माण होतील. 4 / 7मिथुन राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारीतील ग्रहांचे संक्रमण राजयोगाच्या वरदानापेक्षा कमी नसेल. व्यवसाय करणाऱ्यांना गुरुचे पाठबळ मिळेल, परिणामी त्यांना चांगला नफा मिळेल. वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल घडतील. परस्पर प्रेम वाढेल. विवाहेच्छुकांना मनासारखे स्थळ मिळेल. ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे खटल्यांमध्ये यश मिळेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. भविष्याची मोठी तरतूद या काळात करणे हितावह ठरेल. 5 / 7फेब्रुवारी महिना कर्क राशीच्या लोकांसाठी आरोग्य आणि आर्थिक लाभाचा काळ असेल. छुपे शत्रू त्रास देऊ शकतील, त्यामुळे सावध राहा. या काळात महागड्या वस्तूंची खरेदी होण्याची शक्यता आहे, जी दीर्घकाळ सुख देईल. व्यवसायासाठी केलेला प्रवास लाभदायक ठरेल. लेखन आणि मुद्रण क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल. रखडलेल्या कामांना गती मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. बराच काळ वाट पाहत असलेली शुभ वार्ता या काळात ऐकायला मिळेल. 6 / 7सिंह राशीच्या लोकांना या महिन्यात संतती आणि प्रेमजीवनाशी संबंधित चांगली बातमी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी प्रगती आणि वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित प्रकरणे मिटतील. मोठ्या धनलाभाची संधी निर्माण होईल. कुटुंबासोबत धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवन सुखकर होईल. नोकरदारांना बढतीची चांगली बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते.7 / 7कुंभ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना अविस्मरणीय ठरणार आहे. ग्रहांच्या संक्रमणाचा जीवनावर सकारात्मक परिणाम होईल. या महिन्यात तुम्हाला वाणीवर आणि भावनांवर संयम ठेवावा लागेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी ही वेळ शुभ ठरेल, मोठे लाभ होतील. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. कुटुंबासोबत तीर्थयात्रेचे नियोजन होऊ शकते. ज्या मनःशांतीच्या शोधात होतात, ती या काळात लाभेल व त्यामुळे आनंदी व्हाल.