शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

शुक्राच्या संक्रमणाने 'या' राशींच्या वाट्याला लवकरच येणार सनई चौघड्याचे सूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 00:00 IST

1 / 6
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सनई चौघड्याचे मुहूर्त नजीक आहेत. अर्थात लवकरच त्यांच्या वैवाहिक जीवनाशी संबंधित समस्या दूर होतील. ते त्यांच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवतील व पुढील आयुष्य आनंदात व्यतीत करतील. याचाच अर्थ शुक्राचे संक्रमण तात्कालिक असले, तरी वृश्चिक राशीला ते कायमस्वरूपी वरदान ठरेल असा योग जुळून येत आहे. ज्यांचा विवाह झाला असेल, त्यांचे दाम्पत्य जीवन अधिक बहरेल.
2 / 6
मकर राशीच्या लोकांच्या सुखात शुक्राच्या संक्रमणादरम्यान वाढ होईल. कलारसिकांसाठी ही पर्वणी आहे. त्यांनी आपल्या गुणांना अधिक खतपाणी घातले तर भविष्यात सुकाळ येणार आहे. ज्यामुळे तुम्हाला अनेक क्षेत्रांमध्ये लाभ मिळतील. विवाहेच्छुकांसाठी लग्नाचे योग जुळून येत आहेत.
3 / 6
तूळ राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण आनंदायी ठरेल. सर्वांशी मिळून मिसळून राहाल. कौटुंबिक जीवन आनंददायी असेल. संक्रमण काळात तुम्हाला करिअरशी संबंधित चांगले परिणाम मिळतील. दाम्पत्य जीवनात माधुर्य येईल.
4 / 6
कर्क राशीच्या विद्यार्थ्यांना यशस्वी घोडदौड करता येईल. कला आणि लेखनाशी संबंधित लोकांना या संक्रमण कालावधीत नवनवीन संधी मिळतील. हा राशी बदल तुमच्यासाठी चांगले परिणाम आणेल. या काळात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.
5 / 6
सिंह राशीच्या लोकांसाठी हा राशी बदल त्यांच्यासाठी शुभ ठरेल. हा कालावधी त्यांच्या आयुष्यात आनंद आणि शांतता आणेल. या काळात तुम्हाला वाहनसौख्य लाभेल. कुटुंबाबरोबर आनंद क्षण वाट्याला येतील. जोडीदाराचा शोध पूर्ण होईल.
6 / 6
वृषभ राशीच्या लोकांसाठी राशीचा बदल अत्यंत शुभ राहणार आहे. या काळात मीडिया आणि फॅशन उद्योगाशी संबंधित लोकांना फायदा होईल. घरच्यांच्या संमतीने प्रेम विवाह यशस्वी होतील. या काळात वैवाहिक जीवन सुखद राहील.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष