शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Diwali 2022: यंदाच्या दिवाळीत अवश्य करा हे प्राचीन उपाय, वर्षभर होईल धनाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 2:29 PM

1 / 6
धनत्रयोदशी-दीपावलीमध्ये केलेले उपाय हे भरपूर धनलाभ मिळवून देत असतात. यामधील काही अचूक उपाय धनप्राप्तीसाठी प्राचीन काळापासून केले जातात. यावर्षी २४ ऑक्टोबर रोजी सोमवारी दिवाळी साजरी होणार आहे. या दिवशी केलेले उपाय तुम्हाला धनासंबंधीच्या समस्यांपासून नेहमीसाठी मुक्तता देऊ शकतात.
2 / 6
हकीक धारण करा: दिवाळीतील पूजेनंतर अभिमंत्रित करून हकीक रत्न धारण करा. त्यामुळे आर्थिक स्थितीमध्ये वेगाने सुधारणा होईल. मात्क हकीक धारण करण्यापूर्वी तज्ज्ञांकडून अवश्य सल्ला घ्या. अन्यथा त्याचा उलट परिणामही होऊ शकतो.
3 / 6
श्रीयंत्र स्थापित करा: धन-संपत्ती मिळवण्यासाठी दिवाळीदिवशी घरी किंवा दुकान फॅक्टरीमध्ये पूजेच्या ठिकाणी लक्ष्मी गणेश यंत्राची विधिपूर्वक स्थापना करा. तसेच दररोज त्याची पूजा करा. त्यामुळे पैशांची चणचण दूर होईल.
4 / 6
पिवळ्या कवड्या: दीपावली पूजनावेळी माता लक्ष्मीला पूजेमध्ये ११ कवड्या अर्पण करा. पुढच्या दिवशी लाल कापडामध्ये त्या पिवळ्या कवड्या बांधून गल्ला किंवा तिजोरीत ठेवा. त्यामुळे धनाची वृद्धी होईल.
5 / 6
पिवळ्या कवड्या: दीपावली पूजनावेळी माता लक्ष्मीला पूजेमध्ये ११ कवड्या अर्पण करा. पुढच्या दिवशी लाल कापडामध्ये त्या पिवळ्या कवड्या बांधून गल्ला किंवा तिजोरीत ठेवा. त्यामुळे धनाची वृद्धी होईल.
6 / 6
पिंपळाखाली दिवा लावा: दिवाळीच्या दिवसांमध्ये पिंपळाच्या झाडाखाली सात दिवे लावा. तसेच पिंपळाच्या झाडाला ७ वेळा प्रदक्षिणा घाला. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन गरिबी दूर होईल आणि धनलाभ होईल. (हे उपाय परंपरा आणि समजुतींवर आधारित आहेत. लोकमत त्यांना दुजोरा देत नाही)
टॅग्स :Diwaliदिवाळी 2022Adhyatmikआध्यात्मिक