शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

वृषभ राशीत चतुर्ग्रही योग: ७ राशींना राजयोग, वरदान काळ; व्यापारात नफा, उत्पन्न वाढ, शुभ-लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 07:00 IST

1 / 10
मे महिन्याची सांगता होत असताना वृषभ राशीत नवग्रहांपैकी चार ग्रह विराजमान होत असून, यामुळे चतुर्ग्रही योग निर्माण होत आहे. मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी गुरु ग्रह वृषभ राशीत विराजमान झाला. यानंतर सूर्य आणि शुक्र या दोन्ही ग्रहांनी नियमित कालावधीनंतर वृषभ राशीत प्रवेश केला. तर, मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३१ मे रोजी नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.
2 / 10
बुध ग्रहाला व्यापार आणि बुद्धीकारक मानले जाते. त्यामुळे बुध ग्रहाचा वृषभ राशीतील प्रवेश अनेकार्थाने महत्त्वाचा आणि विशेष मानला जात आहे. बुध ग्रहाच्या वृषभ राशीतील प्रवेशाने केवळ चतुर्ग्रही योग नाही, तर बुधादित्य हा राजयोगही जुळून येणार आहे.
3 / 10
वृषभ राशीत निर्माण होत असलेला चतुर्ग्रही योग राजयोगाप्रमाणे फले देऊ शकतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. हा चतुर्ग्रही योग काही राशींसाठी वरदान काळ ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. कोणत्या राशींना या चतुर्ग्रही योगाचा उत्तम लाभ प्राप्त होऊ शकेल, कसा प्रभाव पडू शकेल, ते जाणून घेऊया...
4 / 10
मेष: चतुर्ग्रही योग शुभ परिणाम देणारा ठरू शकेल. वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांनी गुंतवणूक केल्यास भविष्यात चांगले परिणाम दिसू शकतात. नोकरदारांना प्रगतीचे नवीन मार्ग उघडू शकतात.
5 / 10
वृषभ: चतुर्ग्रही योग लाभदायक ठरू शकेल. नोकरीच्या संधी प्राप्त होऊ शकतील. आर्थिक समस्याही दूर होण्याची शक्यता आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. सन्मानही वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि समर्पण पाहून वरिष्ठांकडून कौतुक होऊ शकेल.
6 / 10
कर्क: चतुर्ग्रही योग सकारात्मक ठरू शकतो. पैशाची आवक वाढू शकेल. प्रगतीचे मार्ग प्रशस्त होऊ शकतील. नोकरीत पदोन्नती आणि व्यवसायात फायदो होण्याची शक्यता आहे. नवा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर वेळ अनुकूल ठरू शकेल. करिअर आणि व्यवसायात चांगले यश मिळेल. नोकरदारांना नवीन नोकरीसाठी चांगली संधी मिळू शकते. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. वादविवाद संपुष्टात येऊ शकतील.
7 / 10
कन्या: चतुर्ग्रही योग फायदेशीर सिद्ध होऊ शकते. बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. नोकरीत प्रमोशन मिळू शकते. कामाच्या ठिकाणी कनिष्ठ आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकते. व्यापारी असाल तर चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.
8 / 10
वृश्चिक: चतुर्ग्रही योगाचा काळ शुभ सिद्ध होऊ शकेल. संपत्ती वाढू शकेल. कुटुंबातील सदस्यांच्या सर्व प्रकारच्या सहकार्यामुळे आत्मविश्वास वाढेल. विवाहेच्छुकांसाठी चांगली स्थळे येऊ शकतात. भागीदारीच्या कामात चांगला नफा मिळू शकतो. जोडीदारासोबत सुसंवाद पूर्वीपेक्षा चांगला होईल. जीवनात समाधानी असू शकाल.
9 / 10
मकर: शैक्षणिक क्षेत्रात यश मिळू शकेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ मिळू शकेल. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. एकूणच हा काळ चांगला आहे.
10 / 10
कुंभ: चतुर्ग्रही योग लाभदायक ठरू शकतो. भौतिक सुखे मिळू शकतात. वाहन आणि मालमत्ता खरेदी करू शकता. नोकरी करणाऱ्यांना करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे. नोकरीत बदल करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. मान-प्रतिष्ठा मिळू शकते. तसेच जर तुम्ही रिअल इस्टेट, मालमत्ता आणि जमिनीशी संबंधित काम केले तर चांगला नफा मिळू शकतो. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य