1 / 6अजाणतेपणी झालेले गैरवर्तन म्हणजे चुका! मात्र त्या वेळीच सुधारल्या नाहीत तर भविष्यात त्या चुका गंभीर अपराधाच्या स्वरूपात समोर येतात. मात्र आचार्य चाणक्य आपल्याला आयुष्यात तीन चुका टाळा असा सल्ला देतात. कारण त्या चुका आपले आयुष्य उध्वस्त करू शकतात. 2 / 6बालपणी झालेल्या चुका अजाणतेपणी झालेल्या चुका म्हणत माफ केल्या जातात तर म्हातारपणी झालेल्या चुका वय झाले हे गृहीत धरून माफ केल्या जातात. मात्र तरुणपणी झालेल्या चुका अक्षम्य मानल्या जातात. कारण अनुभवांचा टप्पा पार करत तरुणपण गाठलेले असते. या टप्प्यात बेजवाबदार होऊन चालत नाही. म्हणून आचार्य चाणक्य यांनी केलेले मार्गदर्शन लक्षात घ्या. 3 / 6तारुण्यात उत्साह वेगळा असतो. हा काळ स्वप्नपूर्तीचा असतो. या काळात अनेक जण रावाचे रंक आणि रंकाचे राव सुद्धा होतात. प्रयत्न योग्य दिशेने असतील तर त्यांना संपत्ती, समृद्धी, प्रसिद्धी मिळते. ते जिथे जातात तिथे त्यांना आदर मिळतो. दुसरीकडे, काही लोक तारुण्यात अशा चुका करतात की त्यांचे परिणाम त्यांना मरेपर्यंत भोगावे लागतात. त्या तीन चुका पुढीलप्रमाणे -4 / 6वाईट संगत - संगतीचा माणसावर खूप मोठा प्रभाव पडतो. विशेषतः तारुण्यात! 'संगती संगते दोषा' असे म्हणतात. म्हणजेच एखाद्याचा चांगला गुण उशिराने अंगिकारला जातो पण वाईट दोष पटकन जडतो. म्हणून आचार्य चाणक्य सांगतात, चुकूनही वाईट लोकांशी संगत करू नका. ड्रग्ज व्यसनी, अनैतिक लोक आणि वेळ वाया घालवणाऱ्यांपासून दूर रहा. असे लोक आयुष्यात काहीही साध्य करू शकत नाहीत.5 / 6वेळेचा अपव्यय - जे लोक तारुण्यात वेळेचे मूल्य समजून घेत नाहीत, त्यांना वेळ देखील मागे सोडतो. जे लोक तारुण्यात विश्रांती आणि अनावश्यक कामात वेळ वाया घालवतात, ते लोक आपले वार्धक्य अर्थात म्हातारपण गरिबीत घालवतात. 6 / 6बेशिस्त जगणे - जे लोक शिस्त पाळत नाहीत, अव्यवस्थित राहतात, ते जीवनात काहीही साध्य करू शकत नाहीत. नियोजनाशिवाय, शिस्तीशिवाय जीवन वाया जाते. असे लोक स्वतः काहीही करत नाहीत आणि नशिबाची वाट पाहत आपले आयुष्य वाया घालवतात.