शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Budhaditya Yoga 2021: वृश्चिक राशीत बुधादित्य योग: कसा असेल प्रभाव? ‘या’ ९ राशीच्या व्यक्तींना शुभ लाभदायक काळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 10:14 IST

1 / 13
ज्योतिषशास्त्रानुसार, वृश्चिक राशीत आता अद्भूत असता बुधादित्य योग जुळून येत आहे. नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य वृश्चिक राशीत विराजमान असून, नवग्रहांमधील कुमार मानला गेलेला बुध २१ नोव्हेंबर रोजी याच राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य आणि बुध एकाच राशीत विराजमान असल्यामुळे या दोन ग्रहांच्या युतीने बुधादित्य नावाचा योग जुळून आला आहे. बुध वृश्चिक राशीत १० डिसेंबरपर्यंत असेल. या बुधादित्य योगाचा कोणत्या राशीच्या व्यक्तींना कसा लाभ होईल, याचा प्रभाव कसा असेल? जाणून घेऊया... (Budhaditya Yoga November 2021)
2 / 13
वृश्चिक राशीतील बुधादित्य योग मेष राशीच्या व्यक्तींना अनुकूल ठरेल. विज्ञान, ज्योतिष, गुढ विषयांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हा कालावधी उत्तम असेल. गुढ विषयांमध्ये रुचि असणाऱ्यांना या काळात काही महत्त्वाचे गवसेल. मात्र, आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
3 / 13
वृश्चिक राशीतील बुधादित्य योग वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आनंदमय ठरू शकेल. सुखद घटना घडू शकतात. जीवनसाथीच्या मदतीने करिअरची गाडी रुळावर येऊ शकेल. भागीदारीतून नफा मिळू शकेल. दाम्पत्य जीवनात आनंद येईल, असे म्हटले जात आहे.
4 / 13
वृश्चिक राशीतील बुधादित्य योग मिथुन राशीच्या सामान्य असेल, असे सांगितले जात आहे. कार्यक्षेत्रातील हितशत्रूंपासून सावधान राहावे. विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. कृती करावी. या काळात सासरच्या मंडळींकडून लाभ मिळू शकतो.
5 / 13
वृश्चिक राशीतील बुधादित्य योग कर्क राशीच्या व्यक्तींना यशकारक ठरू शकेल. एखाद्या मंगल कार्यात आपण सहभागी होऊ शकाल. तसेच प्रेमात असलेल्या व्यक्तींसाठी सकारात्मक बदल दिसू शकतील, असे सांगितले जात आहे.
6 / 13
वृश्चिक राशीतील बुधादित्य योग सिंह राशीच्या व्यक्तींना सुखकारक ठरू शकेल. वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. तसेच कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ जाईल. नोकरदार वर्गाला कार्यक्षेत्रात अनुकूल परिणाम प्राप्त होऊ शकतील.
7 / 13
वृश्चिक राशीतील बुधादित्य योग कन्या राशीच्या व्यक्तींना चांगला ठरू शकेल. आत्मविश्वासात वाढ होईल. कार्यक्षेत्रात आपण घेत असलेल्या मेहनतीचे चांगले फळ मिळू शकेल. आरोग्य सुधारेल, असे सांगितले जात आहे.
8 / 13
वृश्चिक राशीतील बुधादित्य योग तुळ राशीच्या व्यक्तींना संमिश्र ठरू शकतो. वाणीत आक्रमकता पाहायला मिळू शकते. रोजगाराच्या उत्तम संधी प्राप्त होऊ शकतील. नातेवाईकांकडून चांगले सहकार्य मिळेल.
9 / 13
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी सूर्य आणि बुधच्या युतीचा बुधादित्य योग सकारात्मक असेल. चिंता, समस्या दूर होऊ शकतील. लक्ष्याप्रति फोकस राहणे हिताचे ठरेल. समाजातील लोकप्रियता वाढू शकेल, असे सांगितले जात आहे.
10 / 13
वृश्चिक राशीतील बुधादित्य योग धनु राशीच्या व्यक्तींना उत्तम ठरू शकेल. अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना अनुकूल परिणामांची प्राप्ती होऊ शकेल. परदेशात जाऊन शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी या कालावधी शुभ वार्ता मिळू शकेल. मनोकामना पूर्ण होऊ शकतील.
11 / 13
वृश्चिक राशीतील बुधादित्य योग मकर राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल. नवीन स्रोतातून धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच अनेकांच्या मनोकामना या कालावधीत पूर्ण होऊ शकतील, असे सांगितले जात आहे.
12 / 13
वृश्चिक राशीतील बुधादित्य योग कुंभ राशीच्या व्यक्तींना चिंतामुक्तीचा ठरू शकेल. करिअरमध्ये असलेल्या समस्या, अडचणी दूर होऊ शकतील. तसेच मनाप्रमाणे नोकरीची संधी मिळू शकेल. तसेच व्यापारी, उद्योजक, व्यवसायिक नवीन योजना आखू शकतात.
13 / 13
वृश्चिक राशीतील बुधादित्य योग मीन राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक ठरेल. धार्मिक कार्यात सक्रीय सहभाग घेऊ शकाल. कामानिमित्त प्रवास घडतील. मात्र, प्रवास लाभदायक ठरू शकतील, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य