शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 12:12 IST

1 / 15
जून महिन्याचा उत्तरार्ध सुरू झाला आहे. नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य मिथुन राशीत विराजमान झालेला आहे. आगामी महिनाभर सूर्य मिथुन राशीत विराजमान असणार आहे. याच राशीत गुरू आणि बुध ग्रह आहेत. त्यामुळे गुरु, सूर्य आणि बुध यांचा त्रिग्रही योग जुळून आलेला आहे. तर सूर्य आणि बुध यांचा बुधादित्य राजयोगही जुळून आलेला आहे.
2 / 15
पुढील काहीच दिवसांत बुध ग्रह मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तोपर्यंत बुधादित्य त्रिग्रही योग कायम राहील. तसेच चंद्र ग्रह कुंभ राशीत असणार आहे. कुंभ राशीत राहु ग्रह आहे. त्यामुळे ग्रहण योग जुळून आलेला आहे. तसेच चंद्र आणि राहु या ग्रहांपासून सप्तम स्थानी असणाऱ्या मंगळ आणि केतुची दृष्टी या ग्रहांवर असणार आहे.
3 / 15
मंगळ ग्रहाच्या चंद्रावरील दृष्टीमुळे धनयोग जुळून आल्याचे बोलले जात आहे. आगामी काही दिवस ही स्थिती कायम असणार आहे. चंद्र ग्रहाने मीन राशीत प्रवेश केला की, या योगाची सांगता होईल. त्यामुळे बुधादित्य त्रिग्रही धनयोगाचा काळ कोणत्या राशींसाठी कसा ठरू शकेल? कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घेऊया...
4 / 15
मेष: हा काळ सकारात्मक परिणाम देणारा आहे. विवाहितांसाठी आनंदाचा कालावधी असेल. दोघांत उत्तम समन्वय असल्याने नाते अधिक दृढ होईल. वैयक्तिक वस्तूंवर खूप खर्च कराल. आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर ती दीर्घ मुदतीसाठी केल्यास फायदेशीर होऊ शकेल. शेअर बाजारात गुंतवणूक करायची असल्यास एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीच्या मदतीने केल्यास ती फायदेशीर होऊ शकेल. व्यापाऱ्यांना एखाद्या नवीन कामाची सुरुवात करता येऊ शकेल. काही नवीन ओळखी होतील ज्यामुळे परदेशात संपर्क करून व्यवसाय परदेशी नेण्यात यशस्वी होऊ शकाल. कारकीर्द उत्तम राहील. नोकरी करणाऱ्यांना अनुकूलता लाभेल. मनाप्रमाणे नवी नोकरी प्राप्त होण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अध्ययनावर लक्ष केंद्रित करावे लागेल. अन्यथा समस्या वाढू शकतील. एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास जाल. आहारावर नियंत्रण राहू शकणार नाही.
5 / 15
वृषभ: एखाद्या समस्येतून दिलासा मिळू शकेल. कुटुंबियांचा सहवास लाभल्याने प्रसन्न राहाल. एकमेकांना समजून घेतल्याने नात्यातील प्रेम वृद्धिंगत होईल. एखादी मोठी आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी कालावधी अनुकूल आहे. भविष्यात हीच गुंतवणूक मोठा लाभ मिळवून देऊ शकेल. व्यापारी योजनांसाठी पैसा खर्च कराल. कारकिर्दीत एक चांगले स्थान निर्माण कराल. व्यावसायिकांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कामात प्रगती करू शकाल. प्राप्तीत वाढ करण्यावर लक्ष केंद्रित कराल. नोकरीत बदल करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. काही तणावांचा प्रभाव परीक्षेवर होण्याची शक्यता असली तरी मन घट्ट करून वाटचाल करावी.
6 / 15
मिथुन: समस्येतून दिलासा मिळेल. वैवाहिक जीवनात काही चढ-उतार आले तरी त्याचा प्रतिकूल परिणाम नात्यावर होणार नाही. एखाद्या योजनेत आर्थिक गुंतवणूक कराल. व्यापारी एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकतील. घरात काही बदल कराल. त्यासाठी पैसा खर्च कराल. व्यापाऱ्यांना मेहनत वाढवावी लागेल. असे केल्यासच त्यांचा व्यवसाय प्रगती करू शकेल. मेहनतीवर विश्वास ठेवावा. नोकरी करणाऱ्या व्यक्ती एखादी दुसरी नोकरी मिळाल्याने प्रसन्न होतील. असे असले तरी आहे त्याच नोकरीत राहणे हितावह होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण जाणवेल. अभ्यासाकडे थोडे दुर्लक्ष होईल. इतर कामात जास्त व्यस्त राहतील. यशस्वी व्हायचे असेल तर मित्र व सामाजिक माध्यमांपासून काही काळ दूर राहावे. वेळेचा सदुपयोग करावा.
7 / 15
कर्क: बुधादित्य त्रिग्रही योग मिश्र फलदायी ठरू शकेल. वैवाहिक जीवनातील समस्या दूर करण्यासाठी कुटुंबातील वयस्कर व्यक्तींची मदत घ्यावी लागू शकेल. आर्थिक बाबतीत सावध राहावे लागेल. कोणाशी आर्थिक व्यवहार करताना तो लेखी स्वरूपात करणे हितावह होईल. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास फायदा होण्याची संभावना आहे. काही व्यापारी योजनांवर स्थगिती येऊ शकते. व्यापारात विचारपूर्वक गुंतवणूक करावी. वडिलांचा सल्ला उपयुक्त ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक होऊन एखाद्या नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळू शकते. विद्यार्थी अभ्यासात भरपूर मेहनत करतील. त्यामुळे चांगले परिणाम मिळतील. एखाद्या सरकारी नोकरीची तयारी करत असाल, तर आनंददायी बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे. ध्यान-धारणा, योगासने यासाठी थोडा वेळ काढावा.
8 / 15
सिंह: बुधादित्य त्रिग्रही योग चांगला ठरू शकेल. सुख - सोयीवर लक्ष द्याल. त्यासाठी पैसा खर्च केला तरी बचतीची एखादी योजना आखावी लागेल. काही पैसे बुडाले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे. कारकिर्दीत एक वेगळे स्थान निर्माण करू शकाल. मेहनतीवर विश्वास ठेवावा लागेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळण्याची संभावना आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययनात येणाऱ्या समस्यांबाबत वरिष्ठांशी बोलावे लागेल. मित्र अभ्यासातून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतील. तेव्हा काही काळासाठी त्यांच्यापासून दूर राहिल्यास अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकाल.
9 / 15
कन्या: हा काळ चढ-उतारांचा आहे. नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. एखाद्या चांगल्या योजनेत आर्थिक गुंतवणूक करणे हिताचे होईल. आर्थिक बाबतीत कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. तसेच कोणालाही उसने पैसे विचारपूर्वकच द्यावेत. नोकरी करणाऱ्यांना कामावर पूर्ण लक्ष द्यावे लागेल, अन्यथा कामात गडबड होण्याची संभावना आहे. कारकीर्द उंचावण्यासाठी मेहनत कराल. विद्यार्थ्यांना अध्ययनात अडथळे आले तरी ते ध्येय गाठू शकतील. मात्र, आत्मविश्वास गमावू नये.
10 / 15
तूळ: मिश्र फलदायी काळ आहे. विवाहितांच्या जीवनात एखाद्या जुन्या कौटुंबिक समस्येमुळे भांडणात वाढ होऊ शकते. नात्यात काहीशी कटुता निर्माण होण्याची संभावना आहे. शक्यतो वाद, भांडणे टाळावी. आर्थिक बाबतीत सावध राहावे लागेल. खर्चात वाढ झाल्याने त्रस्त व्हाल. कोणतीही आर्थिक गुंतवणूक अल्प कालावधीसाठी करू नये. अन्यथा काही त्रास होऊ शकतो. व्यापारी एखाद्या नवीन प्रकल्पावर काम सुरू करू शकतील. प्रॉपर्टीशी क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करत आहेत, त्यांना फायदा होण्याची संभावना आहे. काही नवीन लोकांच्या मदतीने व्यवसायाचा विस्तार करू शकाल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामाच्या बाबतीत काहीसे त्रस्त होतील. शासकीय नोकरीत असणाऱ्यांना एखादा पुरस्कार मिळण्याची संभावना आहे. कारकीर्द उंचावेल. विद्यार्थी त्यांच्या मित्रांच्या सहवासात मौज - मजा करतील. तसेच कुटुंबियांना कामात मदत करतील. अभ्यासाला पुरेसा वेळ मिळणार नाही. त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या परीक्षेवर होताना दिसून येईल. कारकिर्दीकडे लक्ष द्यावे लागेल.
11 / 15
वृश्चिक: हा काळ मिश्र फलदायी आहे. वैवाहिक जोडीदाराच्या भावनांचा आदर करावा. जोडीदाराच्या सहवासात आपण सुखद क्षण घालवू शकाल. गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. त्यासाठी खर्च कराल. एखाद्या वस्तूची फर्माईश करू शकाल. प्राप्तीचा विचार करून एखादी आर्थिक गुंतवणूक करण्याची योजना आखू शकता. एखाद्या प्रॉपर्टीत दीर्घ काळासाठी गुंतवणूक केल्यास चांगला लाभ होईल. व्यापाऱ्यांसाठी कालावधी चांगला आहे. ते त्यांची एखादी योजना पुन्हा सुरू करू शकतील. त्यातून लाभ मिळू शकतो. एखादी नवीन गुंतवणूक करू शकता. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. घर व काम यात समतोल साधावा लागेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. इतरत्र लक्ष दिल्यास त्यांचे एकाग्रचित्त होऊ शकणार नाही. त्याचा विपरीत परिणाम अभ्यासावर होईल.
12 / 15
धनु: काहीसा प्रतिकूल कालावधी ठरू शकेल. वैवाहिक जोडीदाराशी वाद होण्याची संभावना आहे. चांगली आर्थिक प्राप्ती झाली तरी खर्च वाढणार आहेत. कुटुंबियांच्या गरजा सहजपणे पूर्ण करू शकाल. मुलांच्या कारकिर्दीच्या निमित्ताने भविष्याची तरतूद म्हणून आर्थिक गुंतवणूक करू शकाल. एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्याची इच्छा असेल तर पूर्ण होऊ शकेल. व्यापाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. मोकळेपणाने आर्थिक गुंतवणूक करू शकतील. ज्याचा त्यांना पूर्ण लाभ मिळेल. असे असले तरी त्यांना योजनांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. नोकरी करणाऱ्यांना कार्यक्षेत्री सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. पदोन्नती झाल्यामुळे एका जागेवरून दुसऱ्या जागी जावे लागू शकते. नोकरीच्या ठिकाणी मेहनत करण्यात मागे राहू नये. विद्यार्थ्यांनी इतरत्र लक्ष घालण्याची आवश्यकता नाही. अन्यथा त्याचा विपरीत परिणाम होऊन त्यांना अपेक्षित परिणाम मिळू शकणार नाही. एखाद्या संशोधनाचा विचार करू शकता.
13 / 15
मकर: इच्छापूर्ती होईल. वैवाहिक नाते दृढ करण्यासाठी जोडीदाराशी बोलून शंकांचे निराकरण करावे लागेल. आर्थिक समस्याने ग्रस्त असाल तर ती दूर होण्याची संभावना आहे. एखादे कर्ज घेण्यासाठी अर्ज केला असेल, तर ते मिळण्याची शक्यता आहे. प्राप्तीच्या स्रोतांवर विशेष लक्ष द्यावे. कारकिर्दीत चांगली कामगिरी करून दाखवण्याची संधी मिळेल. कामानिमित्त प्रवास करावे लागू शकतात. व्यापारी व्यवसायात एखाद्या दुसऱ्या कामाची सुरुवात करू शकतात. सकारात्मक प्रभाव योजनांवर होईल. योजनेतून चांगला लाभ होण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्यांना कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. कामातील कामचुकारपणा समस्येस कारणीभूत ठरू शकेल. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला आहे. ते एखाद्या नवीन अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. एखाद्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल. अभ्यासात त्यांचे मित्र मदत करू शकतील. एखादी समस्या असेल तर ती दूर होण्याची संभावना आहे.
14 / 15
कुंभ: वैवाहिक जीवनातील समस्यांपासून सुटका होईल. कुटुंबीय महत्व देऊ लागतील. नाती दृढ होतील. खर्चांवर तसेच बचतीवर लक्ष केंद्रित करावे लागेल. गरजा पूर्ण करताना विचार न करता खर्च करू लागाल. त्यामुळे पैश्यांची कमतरता भासू लागेल. असे असून त्रस्त होणार नाही. व्यावसायिक मेहनतीत कोणतीही कसर सोडणार नाहीत. एखाद्या नवीन कामाची सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील. त्यात कुटुंबीय सहकार्य करतील. नोकरी करणाऱ्यांना सावध राहावे लागेल. दुसऱ्या नोकरीची ऑफर येण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांना काही अवघड विषय समजून घेणे जड जाईल. त्यासाठी वरिष्ठांशी बोलणी करणे हितावह होईल. त्यांना एखाद्या नवीन विषयाची गोडी लागू शकते.
15 / 15
मीन: काही वायफळ खर्च होऊ शकतात. एखाद्या प्रॉपर्टीत आर्थिक गुंतवणूक करणे हिताचे होईल. तसेच एखादे वाहन खरेदी करायचे असेल तर ते करू शकाल. व्यापाऱ्यांना चांगला लाभ होईल. परंतु त्यासाठी जास्त कष्ट करावे लागतील. मेहनत करणे सुरूच ठेवावे. नोकरी करणाऱ्यांना एखादी नवीन संधी मिळू शकते. ही संधी पदोन्नतीस अनुकूल ठरू शकते किंवा दुसरी नोकरी मिळू शकते. विद्यार्थी ज्ञान वाढविण्याचा प्रयत्न करतील. ते मेहनत करतील. परंतु आत्मविश्वासाच्या अभावामुळे अपेक्षित फळ मिळू शकणार नाही. मित्र लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतील.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यspiritualअध्यात्मिक