शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Budh Gochar 2023: मेष राशीत बुध-राहुचा संयोग, या पाच राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठं यश मिळणार, कमाईही भरपूर होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 12:00 IST

1 / 7
३१ मार्च रोजी बुध मेष राशीत प्रवेश करेल. त्यानंतर १४ एप्रिल रोजी सूर्य देखील मेष राशीत प्रवेश करेल आणि बुधासोबत बुधादित्य योग तयार करेल.
2 / 7
या शुभ योगाच्या प्रभावामुळे अनेक राशींची आर्थिक स्थिती सुधारेल आणि नोकरदार लोकांना चांगल्या संधी उपलब्ध होतील. चला जाणून घेऊया जेव्हा बुध मेष राशीत प्रवेश करेल आणि राहुशी संयोग होईल तेव्हा कोणत्या राशींना फायदा होईल.
3 / 7
मिथुन - बुधाच्या या प्रवेशानं तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक पैसे वाचवू शकाल. तुमची मेहनत यशस्वी होईल आणि तुम्हाला धनप्राप्तीच्या शुभ संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या काही जुन्या इच्छा पूर्ण होऊ शकतात आणि या काळात तुम्ही जमीन मालमत्ता देखील खरेदी करू शकता. कुटुंबातील सर्वांशी तुमचे संबंध दृढ होतील आणि शिक्षणासाठी देखील हा उत्तम काळ ठरू शकतो.
4 / 7
कर्क - या दरम्यान तुम्हाला नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील लहान भावंड किंवा अन्य मोठ्या व्यक्तींसह तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. मोठ्या कंपनीत किंवा बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्यांसाठी हा काळ यशानं भरलेला असू शकतो. तुमचं कौटुंबिक जीवन देखील आनंदानं भरलेलं असेल. लांबच्या प्रवास घडू शकतो. कुटुंबीयांसोबत तुमचे संबंध मधूर होतील.
5 / 7
सिंह - या कालावधीत तुम्हाला भाग्याची साथ मिळू शकते. तुम्ही सध्या ज्या प्रोजेक्टवर काम करत आहात त्यात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे आणि तुम्ही भविष्यासाठी पैसेही वाचवू शकाल. तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात. दरम्यान, धार्मिक कार्यांकडे तुमचा कल वाढेल आणि सेवाकार्यात तुमची आवड वाढू शकते. प्रवासासाठी खर्च होऊ शकतो. जे तत्वज्ञानी, लेखक, सल्लागार किंवा शिक्षक आहेत त्यांना त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट संधी मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची संधी मिळू शकते. तुम्हाला वडील आणि गुरूंचे पूर्ण मार्गदर्शन मिळेल. ते तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.
6 / 7
धनु - विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय चांगला ठरू शकतो. उच्च शिक्षणाशी संबंधित उत्कृष्ट संधी मिळू शकतात. जे लोक आपले शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात आहेत आणि नवीन आहेत त्यांच्यासाठी ही वेळ नवीन आणि उत्कृष्ट संधी घेऊन येऊ शकते. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास आपल्या जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे. जे प्रेमसंबंधात आहेत आणि लग्नाबाबत निर्णय घेऊ इच्छितात, त्यांच्यासाठीही हा काळ चांगला ठरू शकतो. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनाही हा काळ चांगल्या संधी उपलब्ध करून देणारा ठरू शकतो.
7 / 7
कुंभ - या कालावधीत तुम्ही कमी अंतराच्या प्रवासाची योजना आखू शकता जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं आणि तुमचा उद्देश पूर्ण होऊ शकतो. माध्यम क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी ही वेळ नवीन संधी प्रदान करू शकते. तुमच्या वडिलांसोबत तुमचे संबंध सुधारण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या सल्ल्यानं तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळू शकेल. ऑफिसमधील वरिष्ठही तुमच्या कामानं प्रभावित होऊन तुमच्या प्रमोशनबद्दल विचार करू शकतात.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य