शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सावधान! फेब्रुवारी महिन्यात 'या' पाच राशींवर पडू शकते शनी देवाची वक्र दृष्टी, करा पुढील उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 13:48 IST

1 / 6
आपल्या आयुष्याला वळण लागण्यासाठी शनी देवाचे आपल्या राशीत येणे स्वागतार्ह मानले पाहिजे आणि त्यांना आवडणार नाहीत अशा चुका टाळल्या पाहिजेत. २४ फेब्रुवारी पर्यंत पुढील पाच राशींनी सावध राहावे आणि शनी देवाचे दुसऱ्या राशीत स्थलांतर होईपर्यंत संयम बाळगला पाहिजे.
2 / 6
मंगळ हा मेष राशीचा स्वामी असून शनि व मंगळ यांच्यात वैर असते. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना पुढील महिना अस्त शनि अस्ताचा त्रास होऊ शकतो. विशेषत: कामाच्या ठिकाणी आपल्या प्रतिमेची काळजी घ्या. वाद टाळा. तणावजन्य परिस्थिती आपोआप टळेल!
3 / 6
कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ आरोग्य आणि करिअरच्या बाबतीत कठीण आहे. विशेषत: नोकरी करणाऱ्यांना या काळात थोडे सावध राहावे लागेल. अन्यथा त्यांना अडचणींचा सामना करावा लागेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये.
4 / 6
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ मानसिक त्रासाचा ठरू शकतो. तुम्हाला संयम ठेवावा लागेल. हे ही दिवस जातील. हे मनाला समजवून कठीण काळाला तोंड दिले पाहिजे. महिनाभराचा प्रश्न आहे, त्यानंतर पुन्हा सगळ्या गोष्टी सुरळीत होतील.
5 / 6
कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ कामात अडथळे आणणारा ठरू शकेल. वरिष्ठांशी वाद, सहकाऱ्यांशी मतभेद या गोष्टींमुळे वातावरण तणावपूर्वक राहील. कोणताही टोकाचा निर्णय घेणे टाळा. या काळात तुमच्या प्रयत्नांची कसोटी लागणार आहे. आरोग्याचीही काळजी घ्या.
6 / 6
तूळ राशीच्या लोकांनी आपल्या सामाजिक प्रतिमेकडे लक्ष दिले पाहिजे. कोणामुळे तुमच्या चारित्र्यावर डाग लागणार नाही याची काळजी घ्या.स्वतःला सिद्ध करण्यासाठी हा काळ प्रयत्नांचा आणि सचोटीचा आहे. कुटुंबातही मतभेद होऊ शकतात. डोकं शांत ठेवा सगळं काही सुरळीतपणे पार पडेल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष