By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 13:27 IST
1 / 6२९ डिसेंबर रोजी शुक्र मकर राशीत प्रवेश करणार आहे. जेव्हा शुक्र मकर राशीत प्रवेश करेल तेव्हा शुक्र शनीचा संयोग होईल. मकर राशीतील शुक्र आणि शनीचं एकत्र येणं मिथुन राशीसह चार राशींसाठी ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने प्रतिकूल दिसत आहे. 2 / 6शुक्र हा ग्रह भौतिक सुख आणि प्रेमाचा कारक ग्रह मानला जातो. परंतु तो प्रतिकूल परिणाम देणार असल्याने या राशींच्या लोकांच्या जीवनात जानेवारी महिन्यात काही चढ उतार दिसून येतील. जाणून घेऊया शुक्राच्या मकरेतील प्रवेशामुळे कोणत्या राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनात समस्यांना सामोरे जावे लागेल.3 / 6मिथुन- मकर राशीत शुक्राच्या प्रवेशामुळे मिथुन राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. या काळात तुमच्या खर्चात वाढ होईल. तसेच, जे प्रेमसंबंधातही काही समस्या निर्माण होऊ शकतात. आरोग्याच्या दृष्टीनंही शुक्राचा हा प्रवेश थोडा त्रासदायक ठरू शकतो. या काळात तुम्हाला दातांची समस्याही निर्माण होऊ शकते. धन संचयातही समस्या उद्ध्भवू शकतात. या परिस्थितीत तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.4 / 6कर्क - मकर राशीतील शुक्राचे प्रवेशानंतर कर्क राशीच्या लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या काळात तुम्ही प्रवासाला जात असाल तर तुम्हाला अधिक काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला मिळणारा नफाही कमी होण्याची शक्यता आहे. कौटुंबीक जीवनातही समस्या निर्माण होऊ शकतात. या कालावधीत आरोग्याच्याही समस्या उद्भवू शकतात.5 / 6वृश्चिक - हा कालावधी वृश्चिक राशीच्या लोकांसाठीही प्रतिकूल ठरण्याची शक्यता आहे. विद्यमान नोकरीपासून संतुष्ट नसल्याने या कालावधीत तुम्ही नोकरी बदलण्याचे प्रयत्न करू शकता. परंतु हे गोचर तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करू शकते. यादरम्यान तुमच्या कामकाजाच्या पद्धतीतही बदल होती. तसंच कौटुंबीक जीवनातही वाद निर्माण होऊ शकतात. या कालावधीत आरोग्यची काळजी घ्या.6 / 6धनु- या कालावधीत धनु राशीच्या लोकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तसंच कोणताही व्यवहार करताना काळजी घेणे आवश्यक आहे. कामकाजाच्या ठिकाणीही दबाव जाणवू शकतो. व्यापारी वर्गाला अपेक्षेपेक्षा कमी लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसंच या कालावधीत आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे.