Astro Tips: लग्न ठरण्यात विलंब? 'हे' पाच वास्तू दोष त्वरित दूर करा; होईल सकारात्मक लाभ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 14:34 IST
1 / 7तुमचे जर लग्न घर असेल किंवा तुमच्या घरात कोणी विवाहोत्सुक असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या गोष्टी असणे फार महत्त्वाचे आहे. त्याबरोबरच नकारात्मक ऊर्जा कशामुळे निर्माण होते ते जाणून घेत त्या वस्तू त्वरित घरातून काढून टाकल्या पाहिजेत. त्याबद्दल वास्तू शास्त्राने कोणत्या सूचना केल्या आहेत ते जाणून घेऊ. 2 / 7घराच्या भिंतीवर छायाचित्र लावताना त्यांची अचूक निवड आवश्यक असते. जसे की घरात युद्धाचे चित्र लावले तर घराचे कुरुक्षेत्र व्हायला वेळ लागणार नाही. आपण जे बोलतो, पाहतो, ऐकतो त्याचा आपल्या मनावर खोलवर परिणाम होतो. म्हणून घरामध्ये युद्धाशी संबंधित चित्र लावू नये. मग ते कुरुक्षेत्रावर उभे असलेले श्रीकृष्ण अर्जुन असो नाहीतर राम आणि रावण! राम-कृष्ण यांच्या अन्य छबी लावा, पण युद्धाशी संबंधित चित्र लावू नका. 3 / 7निवडुंग काटेरी असला तरी तो इतक्या आकर्षक प्रकारचा मिळतो की काटेरी असूनही तो घेण्याचा मोह आवरता येत नाही. वास्तुशास्त्रानुसार अशी रोपे नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. घराबाहेरील अंगणात शोभेसाठी ती रोपटी ठेवा पण घरात काटेदार झुडूप ठेवू नका. 4 / 7घराच्या दक्षिण दिशेला आरसा लावला असेल तर तो तिथून काढून दुसरीकडे लावा. दक्षिण ही यमराजाची दिशा असल्यामुळे तिथे नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी दिशा मानली जाते. आरशात आपण आपली प्रतिमा पाहतो. ती पाहून मनात नकारात्मक विचार निर्माण होऊ नयेत असे वाटत असेल तर दक्षिण दिशेला आरसा ठेवू नका. 5 / 7घराचा एक कोपरा निर्माल्य ठेवण्यासाठी वापरलेला असतो. ज्यात रोजच्या रोज देवपूजेची फुले साठवली जातात आणि काही काळानंतर ती नदीत, बागेत विसर्जित केली जातात. मात्र वास्तू शास्त्रानुसार निर्माल्य रोजच्या रोज विसर्जित करणे केव्हाही चांगले. फार दिवस ठेवले तर त्यातून दुर्गंध येतो. त्या कोपऱ्यात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच तसबिरीला लावलेले, वाळलेले हार वेळीच काढून टाका. 6 / 7ज्यांचे लग्न ठरले आहे वा ठरणार आहे, त्यांनी पूर्व पश्चिम दिशेला झोपणे केव्हाही चांगले. निदान दक्षिणेकडे पाय वा डोके करून अजिबात झोपू नये. मन अस्थिर होते, निद्रानाश होतो आणि आयुष्यात होणाऱ्या चांगल्या घटना होण्यास विलंब होतो. 7 / 7हळद जशी आयुर्वेदाच्या दृष्टीने गुणकारी तशीच वास्तू आणि ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरते. विवाहोत्सुक मुलं मुलींनी लग्न ठरेपर्यंत, पार पडेपर्यंत रोज अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद घालावी. हळदीमुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि लग्नात होणारा विलंब दूर होऊन शुभ कार्य ठरते, आनंदाने पार पडते.