Planetary Position in October 2021: ऑक्टोबर महिन्यात ४ ग्रहांचे राशीपरिवर्तन; ‘या’ ६ राशींना ठरेल खूप फायदेशीर, लाभदायक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 09:55 IST
1 / 10सप्टेंबर महिन्याप्रमाणे ऑक्टोबर महिनाही ज्योतिषीय दृष्टीने विशेष ठरणार आहे. ऑक्टोबर महिन्यात चार ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत मार्गी किंवा वक्री चलनाने परिवर्तन करणार आहेत. (planetary position in october 2021)2 / 10ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला शुक्र आणि बुध हे दोन ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत. भौतिक सुखाचा कारक असलेला शुक्र तूळ राशीतून वृश्चिक राशीत मार्गी चलनाने प्रवेश करेल. तर नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध तूळ राशीतून वक्री चलनाने आपलेच स्वामित्व असलेल्या कन्या राशीत प्रवेश करेल. (four planets are going to change in october month 2021)3 / 10याशिवाय नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या या राशी संक्रमणाला तूळ संक्रांत असेही संबोधले जाते. ऑक्टोबर महिन्याच्या मध्यावर सूर्याचे राशीपरिवर्तन होणार आहे. तर, नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह सूर्यानंतर तूळ राशीत प्रवेश करेल. 4 / 10नवग्रहातील या महत्त्वाच्या ग्रहांच्या या वक्री तसेच मार्गी चलनाने होणाऱ्या राशीपरिवर्तनाचा काही राशीच्या व्यक्तींवर उत्तम परिणाम होईल. तर, काही राशींना सांभाळून, काळजीपूर्वक वर्तन, व्यवहार करावा लागेल. राशीचक्रातील ६ राशींना किंवा या राशीच्या व्यक्तींना ऑक्टोबर महिन्यातील राशीपरिवर्तन लाभदायक आणि फायदेशीर ठरू शकते. जाणून घ्या...5 / 10ऑक्टोबर महिन्यातील ४ ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा मेष राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. या कालावधीत अनेकविध क्षेत्रात यश, प्रगती साध्य करता येऊ शकेल. तसेच लाभाच्या अनेक संधी प्राप्त होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी ऑक्टोबर महिना अनुकूल राहील. नवीन दिशा सापडू शकतील. कौटुंबिक, दाम्पत्य जीवन चांगले राहू शकेल. वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होऊ शकेल, असे सांगितले जात आहे. 6 / 10ऑक्टोबर महिन्यातील ४ ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा मिथुन राशीच्या व्यक्तींना चांगला फायदा मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. आर्थिक आघाडीवर हा कालावधी उत्तम राहू शकेल. धनसंचय करण्यात यश मिळू शकेल. न्यायालयीन कामकाजात सकारात्मकता येऊ शकेल. कार्यक्षेत्रातील अधिकारी आणि सहकारी वर्गाचा उत्तम पाठिंबा मिळू शकेल. तसेच दाम्पत्य जीवन आनंदी राहू शकेल, असे सांगितले जात आहे. 7 / 10ऑक्टोबर महिन्यातील ४ ग्रहांचे राशीपरिवर्तन सिंह राशीच्या व्यक्तींना अनुकूल ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. ऑक्टोबर महिन्यात मिळकतीत वाढ होऊ शकते. तसेच भविष्यातील योजनांवर काम करण्याची उत्तम संधी प्राप्त होऊ शकेल. कुटुंबातील सदस्यांचा चांगला पाठिंबा मिळू शकेल. मतभेद दूर होऊ शकतील. प्रतिमा सुधारणा होईल, असे सांगितले जात आहे. 8 / 10ऑक्टोबर महिन्यातील ४ ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा तूळ राशीच्या व्यक्तींना शुभ लाभ मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. या कालावधीत गुंतवणुकीची उत्तम संधी प्राप्त होऊ शकेल. स्थावर मालमत्तेशी निगडीत गुंतवणूक लाभदायक ठरू शकते. परदेशी किंवा बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्यांना चांगला फायदा मिळू शकेल. मित्रांसोबतचा वेळ आनंदात जाईल. प्रतिमा संवर्धन तसेच आपल्या स्वभावाचा एक वेगळा पैलू समोर येऊ शकेल. घराची डागडुजी, नवीन गोष्टींच्या खरेदीची इच्छा पूर्णत्वास जाऊ शकेल, असे सांगितले जात आहे. 9 / 10ऑक्टोबर महिन्यातील ४ ग्रहांचे राशीपरिवर्तन धनु राशीच्या व्यक्तींना सकारात्मक आणि चांगले परिणाम देणारे ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. विद्यार्थी वर्गासाठी आगामी काळ चांगला ठरू शकेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा कालावधी शुभ ठरू शकेल. मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार यशस्वी ठरू शकतील. वेतनवृद्धीचे योग जुळून येऊ शकतील. ग्रहांचे पाठबळ प्राप्त होऊ शकेल. सकारात्मक विचारांमुळे सन्मान मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. 10 / 10ऑक्टोबर महिन्यातील ४ ग्रहांचे राशीपरिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींना आनंददायी ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकेल. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल. कार्यक्षेत्रात आपण घेत असलेल्या मेहनतीचा पूरेपूर लाभ या कालावधीत मिळू शकेल. यश, प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. सामाजिक प्रभाव वाढू शकेल. ग्रहांचे पाठबळ, शुभ प्रभाव यामुळे खासगी जीवन आनंददायी तसेच समृद्धीचा अनुभव प्राप्त होऊ शकेल, असे सांगितले जात आहे.