1 / 11मे महिन्याच्या अखेरीस मायावी आणि क्रूर मानल्या गेलेल्या राहु आणि केतु या ग्रहांचे गोचर होणार आहे. राहु आणि केतु अनुक्रमे कुंभ आणि सिंह या राशीत प्रवेश करणार आहेत. यानंतर जूनमध्ये मंगळ, बुध, सूर्य आणि शुक्र हे चार ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत.2 / 11मंगळ ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत असलेल्या केतु ग्रहाशी विस्फोटक योग जुळून येत आहे. तसेच बुध स्वराशीत म्हणजेच मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. सूर्यही मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. या दोन्ही ग्रहांच्या युतीने बुधादित्य राजयोग जुळून येणार आहे. 3 / 11काहीच दिवसानंतर बुध पुन्हा एकदा राशी परिवर्तन करून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तसेच जून महिन्याच्या अखेरीस शुक्र ग्रह स्वराशीत म्हणजेच वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. या एकंदरीत ग्रह गोचराचा कोणत्या राशींना सर्वोत्तम सकारात्मक लाभ प्राप्त होऊ शकतो? जाणून घेऊया...4 / 11सिंह: अडकलेले पैसे मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक जीवनात यश मिळेल. नवीन व्यवहारातून नफा होईल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. नातेसंबंध अधिक दृढ होतील. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये नफा मिळू शकेल.5 / 11कन्या: कामात आणि व्यवसायात विशेष प्रगती मिळू शकते. बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. नोकरी करणारे असाल तर कामाचे कौतुक होईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. व्यावसायिकांसाठी हा फायदेशीर काळ आहे. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत उघडतील. वडिलांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. जमीन किंवा वाहन खरेदी करण्याची चांगली संधी मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि आरामदायी वाटेल.6 / 11तूळ: पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. कारकिर्दीत मोठे यश मिळू शकेल. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते. जे व्यापारी वर्ग आहेत, त्यांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. अडकलेले पैसे मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारेल. देशात आणि परदेशात प्रवास करू शकता. परदेशातून लाभ होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी नवीन उंची गाठू शकता. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.7 / 11वृश्चिक: प्रलंबित काम पूर्ण होण्यास सुरुवात होईल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नवीन नोकरी किंवा पदोन्नतीच्या शोधात असाल तर हा काळ खूप शुभ आहे. व्यवसायिकांसाठी प्रवास फायदेशीर ठरू शकतो. या काळात धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. तीर्थस्थळाला भेट देऊ शकता. प्रलंबित मालमत्तेचा व्यवहार पूर्ण होऊ शकतो किंवा नवीन गुंतवणूक नफा देऊ शकते.8 / 11धनु: कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. वाहन किंवा मालमत्तेचे व्यवहार करू शकता. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन अद्भुत असेल. रिअल इस्टेटशी संबंधित बाबींमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे.9 / 11कुंभ: वैवाहिक जीवन अद्भुत असेल. नशिबाची साथ मिळेल. जोडीदाराची प्रगती होऊ शकते. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. कारकिर्दीत मोठे यश मिळेल. कामाच्या ठिकाणी नातेवाईकांकडून आणि सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. ज्यामुळे कामे सहज पूर्ण होऊ शकतील.10 / 11मीन: भौतिक सुखे मिळू शकतात. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. नात्यात गोडवा वाढेल. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. करिअरशी संबंधित नवीन योजना राबवू शकाल. एक नवीन प्रकल्प किंवा भागीदारी सुरू होऊ शकते, जी भविष्यात फलदायी ठरू शकेल.11 / 11- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.