शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या महिलांना मिळालेले जगातील पहिले ड्रायव्हिंग लायसन; ३७ वर्षे वाट पहावी लागलेली...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 12:27 PM

1 / 7
सध्याच्या काळात काही अरब, कट्टर मुस्लिम देश सोडले तर बहुतांश सर्वच देशांत महिला कार-दुचाकी चालवितात. तेथील प्रशासनाकडून यासाठी महिलांना लायसनही दिले जाते. परंतू, महिलांना लायसन देण्यात कुठे सुरुवात झाली, कोणाला पहिले लायसन मिळाले, तुम्हाला माहितीय का...
2 / 7
सौदी सारख्या देशांमध्ये अगदी काही वर्षांपर्यंत महिलांना वाहन चालविण्याची परवानगी नव्हती, नाहीय. परंतू, आपल्या भारतात महिला ट्रेन, मेट्रो ते अगदी विमानेही चालवत आहेत.
3 / 7
महिलांसाठी जगातील पहिले लायसन हे अमेरिकेने जारी केले होते. सॅली रॉबिन्सन यांना सप्टेंबर १९३७ मध्ये दुचाकी चालविण्याचे लायसन मिळाले होते.
4 / 7
यासाठी सॅली यांना अधिकाऱ्यांसोबत कित्येक दिवस झगडावे लागले आहे. सॅली यांना सॅली हॉल्टरमॅन या नावानेही ओळखले जाते. ज्या काळात सॅली यांना लाय़सन मिळाले त्या काळात महिलांसाठी अशक्यप्राय गोष्ट होती.
5 / 7
अमेरिकेच्या वृत्तपत्रानुसार सॅली या उंचीने छोट्या होत्या. त्या केवळ ४ फीट ११ इंच उंच होत्या. तेव्हाच्या बाईक या उंच होत्या. यामुळे त्यांना हे लायसन मिळणे तसे कठीणच होते. तरीही त्या लढत राहिल्या, अधिकाऱ्यांना झुकावेच लागले आणि लायसन मिळविले.
6 / 7
सुरुवातीच्या काळात वॉशिंग्टन डी.सीमध्ये महिला प्रामुख्याने कार चालवायच्या. त्यासाठी त्यांना कार चालविण्याचे लायसन दिले जायचे. साल 1900 मध्ये अॅनी फ्रेंच या जगातील पहिल्या महिला कार चालक बनल्या होत्या.
7 / 7
अॅनीला जगातील पहिले महिलांसाठीचे चार चाकी ड्रायव्हिंग लायसन्स जारी करण्यात आले. त्यानंतर तब्बल 37 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सॅली रॉबिन्सनला दुचाकी चालवण्याचा पहिला परवाना मिळाला.
टॅग्स :Americaअमेरिका