शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 18:40 IST

1 / 7
टाटा मोटर्सने नुकतीच २२ वर्षांनी त्यांची आयकॉनिक एसयुव्ही सिएरा पुन्हा एकदा रिलाँच केली आहे. नवा लुक आणि फिचर्सनी ही कार युक्त आहे. ही कार प्रतिस्पर्धी नाही तर आपल्याच नेक्सॉन, हॅरिअर सारख्या कारना खाऊन टाकेल असे म्हटले जात आहे. कारण ही एवढी हायटेक आणि धासू लुकवाली एसयुव्ही पाहिली तर कोण नेक्सॉन घेणार, असाच सवाल अनेकांच्या मनात येत आहे. परंतू, असे फार कमी प्रमाणावर होणार आहे. चला पाहुया...
2 / 7
टाटा नेक्सॉनची पुण्यातील एक्स शोरुम किंमत 7.31 लाखांच्या आसपास सुरु होते. तर ऑन रोड 8.69 पासून पुढे जाते. हे बेस मॉडेल आहे. अनेकजण व्हॅल्यू फॉर मनी मॉडेल घेतात, ज्याची किंमत १०-११ लाखांच्या आसपास असते. परंतू, टाटाची नवी सिएराची किंमत ११.२९ लाख रुपयांना सुरु होत आहे. ही एक्सशोरुम आणि इंट्रोडक्टरी किंमत आहे. म्हणजेच ही किंमत हाईप तयार करण्यासाठी ठेवलेली असून काही दिवसांतच ती वाढणार आहे, हे नक्की आहे.
3 / 7
टाटा सिएराची बेस मॉडेलची ऑन रोड किंमत 13.66 लाख रुपयांच्या वर जाणार आहे. ही पेट्रोल इंजिनची किंमत आहे. सिएरामध्ये दोन पेट्रोल इंजिन येणार आहेत. डिझेल त्यावर असणार आहे. टाटाची ही किंमत 'Smart Plus' (पेट्रोल, मॅन्युअल) या सर्वात कमी श्रेणीच्या व्हेरिअंटसाठी असणार आहे. टाटाने केवळ याच मॉडेलची किंमत जाहीर केली आहे. इतर व्हेरिअंटच्या किंमती अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. यामुळे त्या नेक्सॉन ग्राहकांच्या हाताबाहेर असणार हे नक्की आहे.
4 / 7
मुळात 'इंट्रोडक्टरी प्राईस' समजून घेणे गरजेचे आहे. यामुळे बाजारात उत्पादनाबद्दल मोठी चर्चा निर्माण होते. तसेच जोरदार बुकिंग मिळते. ज्या कारची बाजारात हाईप तयार झालेली असते त्याची अशी किंमत ठेवली जाते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ही किंमत केवळ लोवर व्हेरिअंटवरच असते. कंपनी आपल्या प्रतिस्पर्धकांपेक्षा कमी किंमत दाखवून ग्राहकांच्या मनात ही 'व्हॅल्यू-फॉर-मनी' कार असल्याची धारणा मजबूत करण्याचे काम करते.
5 / 7
सिएराचे टॉप-एंड मॉडेल्स Accomplished+, डिझेल, ऑटोमॅटिक आदींची किंमत खूप जास्त असणार आहे. टाटा सिएरा २०२५ एकूण सात व्हेरियंट्समध्ये Smart+, Pure, Pure+, Adventure, Adventure+, Accomplished आणि Accomplished+ उपलब्ध असणार आहे. परंतू, केवळ पहिल्याच व्हेरिअंटची इन्ट्रोडक्टरी किंमत कंपनीने जाहीर केली आहे. उर्वरित किंमतींवर कंपनीने पडदाच टाकला आहे.
6 / 7
याचा तोटा काहीसा नेक्सॉनला बसणार आहे, कारण ज्यांचे बजेट १४-१५ लाखांचे आहे ते या सिएराकडे वळणार आहेत. तसेच ज्यांचे बजेट हॅरिअरचे आहे ते देखील या कारकडे वळण्याची शक्यता आहे. नवीन लूक, आकर्षक फिचर्स आणि बांधणी हे याचे कारण असणार आहे. याचा थोडाफार फटका टाटाच्याच कारना बसण्याची शक्यता असली तरी फायदा टाटा कंपनीचाच होणार आहे.
7 / 7
सिएरा क्रेटा, सेल्टॉस, महिंद्रा सारख्यांचा सेल खाणार आहे. यामुळे टाटाला त्यांचा ग्राहक मिळणार आहेच, पण सोबत इतर कंपन्यांकडे जाणारे ग्राहक आपल्याकडे वळविण्यात टाटा यशस्वी ठरणार आहे. फक्त आता टाटाने सर्व्हिस सुधरवण्याची आवश्यकता आहे.
टॅग्स :Tataटाटा