देसी ब्रँड TVS ची मेगा ऑफर! ५ हजार भरा अन् ‘ही’ पॉप्युलर स्कूटर घरी न्या; तुम्ही केली का बुक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 19:46 IST
1 / 9भारतीय ग्राहकांमध्ये टू-व्हीलरची क्रेझ मोठी आहे. अनेक कंपन्या आपली विविध प्रकारची उत्पादने बाजारात सादर करत असतात. आताच्या घडीला टू-व्हीलर सेगमेंटमध्ये होंडा कंपनी आघाडीवर असून, देसी भारतीय ब्रँड TVS त्याला जोरदार टक्कर देताना पाहायला मिळत आहे. 2 / 9TVS स्वदेशी मेक इन इंडिया कंपनीच्या अनेकविध प्रकारच्या टू-व्हीलर मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. स्कूटर, मोटरसायकलची वैविध्य आणि वैशिष्ट्यपूर्ण रेंज असलेल्या TVS टू-व्हीलर 110 आणि 125 सीसी पर्यायात सादर केलेल्या आहेत. 3 / 9TVS Jupiter कंपनीची लोकप्रिय स्कूटर आहे. होंडा अॅक्टिव्हानंतर सर्वाधिक खपाची स्कूटर म्हणून टीव्हीएस ज्युपिटरकडे पाहिले जाते. TVS Jupiter ची प्रत्येक महिन्याला जबरदस्त विक्री होते. लोकांना कमी किंमतीत शानदार मायलेज आणि याचे जबरदस्त लूक असल्याने लोक या स्कूटरला जास्त पसंत करतात.4 / 9TVS Jupiter 110 आणि 125 सीसी या दोन्ही इंजिन पर्यायात उपलब्ध आहे. अलीकडेच TVS कंपनीने 125 सीसीची Jupiter लॉंच केली होती. यानंतर 125 सीसीच्या स्कूटरलाही ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे. 5 / 9TVS Jupiter 125 च्या स्कूटरमध्ये सिंगल सिलेंडर एअर कूल्ड इंजिनचा वापर करण्यात आला आहे. जे ८.३ पीएसचे पॉवर आणि १०.५ एनएमचे टॉप टॉर्क जनरेट करते. हे इंजिन सीव्हीटी गिअरबॉक्स सोबत येते. 6 / 9TVS Jupiter या स्कूटरमध्ये अनेक अडवॉन्स्ड फीचर्स दिले आहेत. जसे इंटेली-गो टेक्नोलॉजी, अलॉय व्हील, डिस्क ब्रेक, इस सेगमेंटचे सर्वात मोठे बूट, यूएसबी सॉकेट आणि एक्सटर्नल फ्यूल फिलर लिड. हे स्कूटर ३ कलर ऑप्शन ब्लू, ऑरेंज आणि ग्रे मध्ये येते.7 / 9TVS Jupiter 125 च्या या स्कूटरची थेट टक्कर होंडा अॅक्टिवा १२५ आणि सुझुकी अॅक्सेस १२५ सोबत होईल. Jupiter 125 आपल्या डिझाइन, फीचर्स आणि किंमत तसेच परफॉर्मन्स मुळे एक चांगली स्कूटर ठरू शकते.8 / 9TVS Jupiter 125 Drum मॉडलची ऑन रोड किंमत ८७ हजार ७२२ रुपये आहे. जर तुम्ही या स्कूटरला ५ हजार रुपये देवून खरेदी करीत असाल तर ईएमआय कॅलक्युलेटरनुसार, ३ वर्षासाठी ८ टक्के व्याजा सोबत तुमचा ईएमआय २८८४ रुपये होईल. 9 / 9तुम्हाला ३ वर्षासाठी २११०२ रुपये द्यावे लागेल. TVS Jupiter 125 Drum वर मिळणारे लोन, डाउनपेमेंट, आणि व्याज दर तुमच्या बँकिंग आणि सिबिल स्कोरवर अवलंबून आहे.