शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Traffic Rules: महाराष्ट्र सरकारनं जारी केला नियम, ट्रॅफिक पोलीस थांबवू शकणार नाहीत तुमची कार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 2:28 PM

1 / 6
Traffic Police Latest Rules: तुम्ही कार चालवत असाल आणि मुंबईत राहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयोगी आहे. नुकतेच महाराष्ट्र सरकारने वाहतुकीशी संबंधित नवीन नियम जारी केले आहेत.
2 / 6
या नियमांनुसार, वाहतूक पोलीस तुम्हाला विनाकारण थांबवून विचारपूस शकणार नाहीत. याशिवाय वाहन तपासणीची परवानगीही वाहतूक पोलिसांकडे राहणार नाही. त्याबाबतचा आदेशही जारी करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांनी याबाबतचे परिपत्रक वाहतूक विभागाला जारी केले आहे.
3 / 6
परिपत्रकानुसार वाहतूक पोलीस वाहनांची तपासणी करणार नाहीत. विशेषत: जिथे चेकनाका आहे, तिथे फक्त वाहतुकीवर लक्ष ठेवता येणार आहे. तसेच, वाहतूक सुरळीत चालू आहे की नाही यावरही लक्ष ठेवावे लागणार आहे.
4 / 6
वाहतुकीच्या वेगावर कोणत्याही प्रकारे परिणाम होत नसेल तरच वाहतूक पोलीस वाहन थांबवू शकतील. वास्तविक, अनेकवेळा वाहतूक पोलीस संशयाच्या आधारे वाहने कोठेही थांबवून बूट व वाहनाच्या आत तपासणी सुरू करतात. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम होतो.
5 / 6
आदेशात काय? -पोलिसांना जारी करण्यात आलेल्या सर्क्युलरमध्ये वाहनांची तपासणी थांबवण्यासाठी सांगण्यात आले आहे. रस्त्यांवर सातत्यानं ट्रॅफिक वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आलाय. ट्रॅफिक पोलिसांना वाहनांच्या ये जा करण्याला प्राधान्य देण्यास सांगण्यात आले आहे.
6 / 6
जर वाहन चालक वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करत असेल तर पोलीस कायद्यांतर्गत त्यांना थांबवू शकतात. वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त नाकाबंदीदरम्यान वाहन चालकांवर कार्यवाही करू शकतील. जर या आदेशाला कठोरपणे लागू न केल्यास संबंधित वाहतूक चौकीच्या वरिष्ठ निरिक्षकांना जबाबदार ठरवलं जाईल.
टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसMaharashtraमहाराष्ट्र