Toyota Innova Electric: पळवा किती पळवायची तेवढी! इनोव्हा इलेक्ट्रीक दिसली; हायक्रॉसपेक्षाही भारी....
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 17:00 IST
1 / 5Toyota Motor (टोयोटा मोटर) ने इंडोनेशियामध्ये इलेक्ट्रीक इनोव्हा लाँच केली आहे. यामुळे भारतातही लवकरच इनोव्हा ईव्ही येण्याची शक्यता आहे. तिथे Innova Zenix नावाने इनोव्हा इलेक्ट्रीक कार लाँच केली आहे.2 / 5भारतीय बाजारात पुढील वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी २०२३ मध्ये लाँच केली जाणार आहे. इलेक्ट्रीक कार आली तरी इनोवा क्रिस्टा आणि इनोव्हा हायक्रॉसची विक्री सुरुच राहणार आहे. इनोव्हा डिझेल इंजिन चाहत्यांमध्ये आणि भाड्याने गाडी चालविणाऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. Toyota Innova (टोयोटा इनोवा) च्या इलेक्ट्रीक व्हर्जनची टेस्टिंग केली जात आहे. 3 / 5टोयोटा ही जगातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी आहे. या वर्षाच्या सुरुवातीला इंडोनेशिया इंटरनॅशनल मोटर शोमध्ये इनोव्हाच्या ईव्ही कॉन्सेप्टला शोकेस करण्यात आले होते. इलेक्ट्रिक एमपीवी पहिल्यांदाच इंडोनेशियात पाहिली गेली आहे. 4 / 5Innova EV कॉन्सेप्ट नव्या Zenix/Hycross वर आधारित नाहीय. ती भारतातील क्रिस्टाच्या प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आली आहे. इनोवा इलेक्ट्रिकचा लूक क्रिस्टासारखाच दिसतो. यामध्ये काहीतरी वेगळे दिसण्यासाठी टोयोटाने ईव्ही सारखे डिझाईन दिले आहे. पुढे ब्लॅक्ड आऊट ग्रील आणि नवीन बंपर देण्यात आला आहे. हे़डलँप सेटअप आणि लोगोवर निळा रंग दिसत आहे. 5 / 5नवीन अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. अंतर्गत भाग ICE सारखेच आहेत. टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 3-स्पोक मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हील, ब्लू ग्राफिक्ससह अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट कन्सोल आदी सारखेच आहेत. यावर इंफोटेनमेंट स्क्रीन बॅटरी लेव्हल, उपलब्ध रेंज और पावर आउटपुट सारखी महत्वपूर्ण माहिती दिली जाते.