शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

500km ची रेंज अन् अत्याधुनिक फिचर्स; लवकरच लॉन्च होणार Toyota ची पहिली EV कार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 11:48 IST

1 / 6
भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. जवळजवळ सर्व कार कंपन्या या शर्यतीत आपला हात आजमावत आहेत. अशा परिस्थितीत Toyota कशी मागे राहू शकते. कंपनी लवकरच बाजारात आपली पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याची तयारी करत आहे. पहिली इलेक्ट्रिक SUV Toyota Urban Cruiser EV लवकरच भारतात लॉन्च होणार आहे.
2 / 6
कंपनीने ब्रुसेल्समध्ये पहिल्यांदा जागतिक स्तरावर ही इलेक्ट्रिक कार सादर केली. तर, भारतातही मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 दरम्यान ही सादर करण्यात आली. वृत्तानुसार, टोयोटा अर्बन क्रूझर ईव्ही या वर्षाच्या अखेरीस भारतात येऊ शकते.
3 / 6
टोयोटा अर्बन क्रूझर ईव्ही ही एक फूल लेंथ इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. कारचा लूक खूपच क्लासी आहे. ही गाडी यारिस क्रॉस आणि मारुती ई-विटारा सारख्या लोकप्रिय एसयूव्हींपेक्षा मोठी आहे. टोयोटा ही इलेक्ट्रिक एसयूव्ही केवळ भारतासाठीच नाही, तर युरोपसाठी देखील तयार करत आहे. म्हणजेच ती भारतातून निर्यात देखील केली जाऊ शकते.
4 / 6
कंपनी दोन बॅटरी पर्यायांसह ईव्ही लॉन्च करणार आहे. पहिला पर्याय 49 किलोवॅट बॅटरीसह आणि दुसरा पर्याय 61 किलोवॅट बॅटरीसह येऊ शकतो. कंपनीचा दावा आहे की, 61 किलोवॅट क्षमतेची बॅटरी व्हेरिएंट पूर्ण चार्ज केल्यावर 500 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज देऊ शकतो. असे झाले, तर ती भारतातील सर्वात लांब पल्ल्याच्या इलेक्ट्रिक एसयूव्हींपैकी एक बनू शकते.
5 / 6
टोयोटा अर्बन क्रूझर ईव्हीमध्ये प्रीमियम आणि आधुनिक वैशिष्ट्ये मिळतील. त्यात एक पॅनोरॅमिक सनरूफदेखील मिळेल. या कारमध्ये बसल्याने एक लक्झरी अनुभव मिळू शकतो. याशिवाय, 360 अंश कॅमेरा सिस्टम बसवण्यात आली आहे. ड्रायव्हरला मदत करण्यासाठी पॉवरयुक्त ड्रायव्हर सीट मिळेल.
6 / 6
सुरक्षितता आणि आरामावर लक्ष केंद्रित करण्यासोबतच, कंपनीने ऑटो होल्ड फंक्शनसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक देखील मिळू शकतात. याशिवाय, मनोरंजनासाठी, त्यात 10.1 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 10.25 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील असेल.
टॅग्स :ToyotaटोयोटाcarकारElectric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर