By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 17:45 IST
1 / 8भारतीय वाहन बाजारात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. येत्या 10 वर्षांत पेट्रोल, डिझेलची कारविक्री बंद होणार आहे. काही कंपन्यांनी तर 2024-25 मध्येच डिझेल, पेट्रोल कारचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपन्यांना इलेक्ट्रीक वाहने बनविण्यासाठी एकीकडे सरकार प्रोत्साहन देत असताना दुसरीकडे विक्री व्हावी म्हणून ग्राहकांनाही भरघोस सूट मिळणार आहे. 2 / 8पेट्रोल, डिझेलच्या कारमुळे प्रदुषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन मिळावे म्हणून केंद्र सरकार या वाहनांवर 50 हजारांची भरघोस सूट देणार आहे. 3 / 8सध्या भारतात इलेक्ट्रीक वाहनांच्या किंमती या खूपच जास्त आहेत. या किंमती सामान्यांच्या आवाक्यात आणण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पेट्रोल, डिझेलच्या वाहनांच्या किंमची या वाहनांपेक्षा कमी आहेत. 4 / 8ग्राहकांना मिळणारा लाभ हा इलेक्ट्रीक वाहनाच्या मॉडेलवर अवलंबून असणार आहे. यामध्ये बॅटरीची क्षमताही विचारात घेतली जाणार आहे. याशिवाय इलेक्ट्रीक वाहन खरेदी करणाऱ्यांना पार्किंग भाडेही माफ केले जाणार आहे. 5 / 8काही राज्यांमध्ये इलेक्ट्रीक वाहनांना नोंदणी कर आणि रस्ते करही माफ करण्यात आला आहे. केंद्र सरकारची नवी योजना पूर्ण देशभरात लागू करण्यात येणार आहे. 6 / 8भारतात अद्याप पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांना प्राधान्य दिले जाते. कारण सीएनजी, इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन पुरेसे उपलब्ध नसणे हे आहे. 7 / 8इलेक्ट्रीक वाहनांच्या किंमती खुपच जास्त आहेत.8 / 8भारतात गेल्या वर्षी केवळ 56 हजार इलेक्ट्रीक वाहने विकली गेली. यामध्ये 54800 केवळ स्कूटर होत्या. 2017 मध्ये हा आकडा 25 हजार एवढाच होता.