1 / 6 World’s First Electric Car: आपल्या सर्वांना वाटतं की, इलेक्ट्रिक कार आधुनिक म्हणजेच आजच्या(21 व्या शतकात) काळात तयार झालेल्या असाव्यात. पण, फार कमी लोकांना माहित नाही की, इलेक्ट्रिक कार बनवण्याचा प्रयत्न 10-20 वर्षांपूर्वी नाही तर 200 तब्बल वर्षांपूर्वी सुरू झाला होता. होय, इलेक्ट्रिक कारचा इतिहास पेट्रोल आणि डिझेल कारच्या इतिहासाइतकाच जुना आहे.2 / 6 पण, त्या काळात इलेक्ट्रिक कारची पॉवर आणि चार्जिंगच्या समस्यांमुळे त्या काळात ही फार लोकप्रिय झाली नाही आणि पुढे या EV कारला पूर्णपणे विकसित होण्यासाठी आणखी 200 वर्षे लागली. चला तर मग जाणून घेऊया पहिली इलेक्ट्रिक कार कशी होती, कोणी बनवली होती आणि त्या कारची रेंज किती होती...3 / 6 19व्या शतकाच्या सुरुवातीपासून जगभरातील अनेक देशांमध्ये विविध प्रकारची वाहने बनवली जात होती. त्याकाळी चार चाकांवर चालणारे वाहन हा लोकांच्या कुतूहलाचा विषय असायचा. पण, त्या काळात फक्त डिझेलवर चालणारी वाहनेच बनवली जायची. पण स्कॉटलंडमधील एका मेकॅनिकने असे काही केले की, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. 4 / 6 1832 मध्ये स्कॉटिश मेकॅनिक रॉबर्ट अँडरसनने जुन्या डिझेलवर चालणाऱ्या कारला इलेक्ट्रिकमध्ये बदलले. त्याने कारमध्ये सिंगल चार्ज बॅटरी वापरली, जी एकदाच चार्ज केली जाऊ शकत होती. ही इलेक्ट्रिक कार ताशी 4 किलोमीटर वेगाने फक्त 2.5 किलोमीटर धावू शकत होती.5 / 6 त्या घटनेच्या 20 वर्षांनंतर रिचार्जेबल बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक कार देखील आली. 1865 मध्ये एका फ्रेंच शास्त्रज्ञाने लीड ऍसिड बॅटरीसह प्रथमच इलेक्ट्रिक कार चालविली. इलेक्ट्रिक कार विकसित करण्याची ही प्रक्रिया सुरू राहिली आणि 1891 मध्ये पहिल्यांदा इलेक्ट्रिक कार अमेरिकेत रस्त्यांवर धावल्या. 6 / 6 आठ वर्षांनंतर थॉमस एडिसनने इलेक्ट्रिक कारसाठी निकेल-अल्कलाइन बॅटरी डिझाइन केली, जी जास्त काळ टिकली. 1899 मध्ये पोर्शने पहिली हायब्रिड कार लॉन्च केली, जी पेट्रोलच्या बॅटरीवर चालू शकत होती. यानंतर वेळोवेळी यावर विविध प्रयोग करण्यात आले, पण बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांचा टिकाव लागला नाही. अखेर 21 व्या शतकात आधुनिक EV कार बनवण्यात आल्या. सध्या या गाड्यांची मोठी मागणी आहे.