शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कॉम्पॅक्ट एसयुव्हींचे दिवस! पण खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या फायदे-तोटे, नाहीतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 11:59 AM

1 / 7
आज वाहन बाजारात कंपन्यांनी एवढे पर्याय दिले आहेत की कार घेणारा कन्फ्यूज होऊन जातो. पहिले कसे होते, एक छोटी कार होती, दुसरी सेदान आणि तिसरी एसयुव्ही होती. आता या सर्वांच्या सरमिसळ करून कंपन्यांनी वेगवेगळ्या शेपच्या कार आणल्या आहेत, त्यात आता बाजारात सेदान, कॉम्पॅक्ट सेदानचे दिवस जाऊन कॉम्पॅक्ट एसयुव्हींचे दिवस आले आहेत.
2 / 7
यात टाटा, मारुती, ह्युंदाई सारख्या कंपन्यांनी ग्राहकांच्या या आवडीकडे लक्ष देत या श्रेणीतील छोट्या, मोठ्या कार लाँच केल्या आहेत. परंतु ही क़ॉम्पॅक्ट एसयुव्ही का खरेदी करायची? त्याचे फायदे काय आणि तोटे काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.
3 / 7
कॉम्पॅक्ट एसयुव्ही खरेदी करण्यामागे ग्राहकांत टशन देण्याचीही इच्छा असते. कारण या गाड्या मस्क्युलर लुक देणाऱ्या असतात. मोठ्या एसयुव्हीपेक्षा कमी गोष्टी यात असतात. परंतु कंफर्टमध्ये या कार उजव्या ठरू लागल्या आहेत.
4 / 7
SUV च्या तुलनेत ह्यांची बसण्याची क्षमता कमी आहे आणि त्यांचा आकार देखील त्या तुलनेत लहान आहे. लहान असल्याने या कार शहरातील ट्रॅफिक आणि गावातील खडकाळ रस्त्यांवर चालविता येतात.
5 / 7
एसयूव्हींना छोट्या गल्ल्या किंवा रस्त्यावर अडकण्याची समस्या भेडसावते. पण कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये असे होत नाही. त्यांचा ग्राऊंड क्लिअरन्स आणि लांबी दोन्ही मापात असते. याचा फायदा ग्राहकांना होतो.
6 / 7
ही वाहने मुख्यतः ऑफ-रोडिंग किंवा खडबडीत रस्त्यावर चालवण्यासाठी बनविली जातात. परंतु कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या तुलनेत पूर्ण एसयूव्हीमध्ये अधिक शक्तिशाली इंजिन असते. अर्थात कॉम्पॅक्ट एसयुव्हीत मायलेजही चांगले मिळते. याचा फायदा ग्राहकांच्या खिशावर होतो.
7 / 7
या सर्व गोष्टी पाहता, कॉम्पॅक्ट एसयुव्ही या छोटा पॅकेट बडा धमाका ठरू लागल्या आहेत. यात आता कंपन्यांनी मिनी एसयुव्ही देखील बाजारात आणल्या आहेत. म्हणजेच कमी बजेट असेल ते लोक देखील एसयुव्हीचा रुबाब मिरवू शकत आहेत.
टॅग्स :TataटाटाMarutiमारुतीHyundaiह्युंदाईRenaultरेनॉल्ट