Tata चं ठरलं! ‘या’ दिवशी लॉंच होणार नवीन Nexon EV; ४०० किमी रेंज अन् जास्त फिचर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 21:07 IST
1 / 9आताच्या घडीला देशात इलेक्ट्रिक सेगमेंट मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. आणि या EV सेगमेंटमध्ये TATA मोटर्स सर्वांत आघाडीवर असून, आपले या क्षेत्रातील वर्चस्व राखून ठेवले आहे. टाटा मोटर्सची प्रचंड लोकप्रिय ठरलेली Tata Nexon EV नवीन रुपात लॉंच केली जात आहे. 2 / 9Tata Nexon EV ही इलेक्ट्रिक कार सेगमेंटची टॉप सेलिंग कार आहे. या महिन्यात टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक कार खरेदी करणार असाल तर फक्त काही दिवस थांबा. कारण, जास्त रेंज देणारी २०२२ टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक लवकरच लॉंच होणार आहे. 3 / 9Tata मोटर्सकडून यासंदर्भात महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. टाटा मोटर्सने ६ एप्रिल रोजी आपली अपकमिंग कार लाँचिंग संबंधी इनव्हाइट पाठवले आहे. यावरून चर्चा सुरू झाली आहे. नवीन टाटा नेक्सॉन ईव्ही आगामी ६ एप्रिलला लाँच केली जाऊ शकते.4 / 9रिपोर्टनुसार, नवीन टाटा नेक्सॉन ईव्ही मध्ये काही कॉस्मेटिक बदल सोबत खूप सारे नवीन फीचर्स आणि ४०० किमी हून जास्त बॅटरी रेंज मिळू शकते. टाटा नेक्सॉन मध्ये 40kWh ची बॅटरी पॅक पाहायला मिळतो. सध्या नेक्सॉन ईव्हीचे जे मॉडल आहे त्यात 30.2kWh ची बॅटरी पॅक दिले आहे.5 / 9Tata Nexon EV 2022 कारमध्ये कंपनी जास्त पॉवरफुल चार्जर सोबत आणणार आहे. सध्या जे मॉडल विकले जात आहे त्यात 3.3kW AC चार्जर लावले आहे. याला तुम्ही घरात सुद्धा चार्ज करू शकता.6 / 9Tata Nexon EV 2022 कारला चार्जिंगसाठी १० तास लागतात. आता नवीन नेक्सॉन इलेक्ट्रिक मध्ये 6.6kW चे एसी चार्जर लावले आहे. ज्यात या कारला कमी वेळेत चार्ज करता येऊ शकते. नवीन नेक्सॉनचे बाकीचे खास फीचर्स मध्ये चार चाकात डिस्क ब्रेक, नवीन डिझाइन की अलॉय व्हील, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग आणि इलेक्ट्रिक स्टॅबिलिटी प्रोग्राम सारखे खास फीचर्स पाहायला मिळते. 7 / 9संभावित किंमतीत नवीन टाटा नेक्सॉन ईव्हीला १७ लाखांहून जास्त सुरुवातीच्या किंमतीत लाँच केले जाण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. 8 / 9दरम्यान, आता देशातील सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार टाटा नेक्सॉन ईव्ही आणखी महाग झाली आहे. Tata Nexon EV कारची किंमत २५ हजार रुपयांनी वाढवली आहे. ही दरवाढ सर्व व्हेरिएंट्सच्या किमतींवर लागू करण्यात आली आहे. 9 / 9सध्या Tata Nexon EV पाच व्हेरिएंट्समध्ये येते. यात XM, XZ Plus, XZ Plus Luxury, Dark XZ Plus आणि Dark XZ Plus Luxury व्हेरिएंट आहेत. या सर्वच व्हेरिएंट्सच्या किंमती वाढल्या आहेत.