पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 17:39 IST
1 / 11आपल्याकडे दसरा, दिवाळी आणि अक्षय तृतीया या सणांच्या शुभमुहूर्तावर गाड्या, सोनं-चांदी, इलेक्ट्रॉनिक्स आणि नवीन घरगुती वस्तू खरेदी करण्याची जुनी परंपरा आहे. सध्या गाड्या खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कोण बाईक खरेदी करतो तर काही जण कार खरेदी करतात.2 / 11तु्म्ही जर या दिवाळीला पल्सर किंवा युनिकॉर्न या दोन बाईकमधील एक बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला या दोन्ही बाईकच्या किंमती आणि मायलेज याबाबत माहिती देणार आहोत. तुम्ही दोन्ही गाड्यांमध्ये तुलना करुन तुम्हाला बाईक खरेदी करण्यासाठी सोपे होईल.3 / 11पल्सर ही बाईक देशात मोठ्या प्रमाणात विक्री होणारी बाईक आहे. Bajaj Pulsar 150 मध्ये 149.5cc चे इंजिन असून सुमारे 14 PS पॉवर आणि 13.25 Nm टॉर्क मिळतो.4 / 11तर होंडा कंपनीच्या युनिकॉर्न या बाईकला सध्या देशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. Honda Unicorn 160 मध्ये 162.7cc चे इंजिन असून 13 PS पॉवर पण 14.5 Nm टॉर्क मिळतो. दोन्ही बाईकच्या इंजनची तुलना केली तर युनिकॉर्न थोडी टॉर्की, तर Pulsar थोडी जास्त पॉवरफुल आणि स्पोर्टी फील देते.5 / 11दोन्ही बाईकच्या मायलेट आणि परफॉर्मन्सबाबत बोलायचे झाल्यास Pulsar चे सरासरी माईलेज 45 ते 47 kmpl आहे, तर Unicorn साधारण 50 ते 55 kmpl पर्यंत माईलेज देते. रोजच्या ऑफिस वापरासाठी Unicorn थोडी जास्त इंधन बचत करणारी ठरते.6 / 11बजाज कंपनीची Pulsar ही स्पोर्टी सस्पेन्शनसह येते. युवक आणि स्पीडप्रेमींसाठी ही बाईक योग्य आहे. तर Unicorn मध्ये मोठी सीट, मऊ सस्पेन्शन आणि संतुलित राइड क्वालिटी आहे.ज्यांना आरामदायी बाईक हवी ते Unicorn या बाईकचा विचार करु शकतात.7 / 11दोन्ही बाईकच्या डिझाइन आणि लूकबाबत पाहिल्यास Pulsar चा लूक दमदार, अॅथलेटिक आणि ट्रेंडी आहे. 8 / 11तर Unicorn साधी पण क्लासिक आणि प्रोफेशनल लूक देणारी आहे. तरुण रायडर्संना Pulsar आकर्षक वाटते, तर मध्यमवयीन वापरकर्त्यांना Unicorn जास्त पसंत पडते.9 / 11सेफ्टीमध्ये दोन्ही बाईकमध्ये सिंगल-चॅनल ABS उपलब्ध आहे. Pulsar मध्ये फ्रंट डिस्क ब्रेक आणि चांगला ग्रिप आहे. Unicorn मध्येही डिस्क-ड्रम कॉम्बो असून ब्रेकिंग संतुलित आहे.10 / 11होंडा आणि बजाज या दोन्ही गाड्यांचे सर्व्हिस सेंटर देशभरात आहेत. यामुळे दोन्ही गाड्यांचे पार्ट्स सहज उपलब्ध होतात.11 / 11Pulsar 150 (BS6) ची ऑन-रोड किंमत – 1.26 लाख ते 1.34 लाख रुपये आहे. तर Unicorn 160 (BS6) ची ऑन-रोड किंमत – 1.35 ते 1.45 लाख रुपये आहे.