‘हा’ नियम कधी तोडू नका, अन्यथा Red Light वर थांबूनही भरावा लागेल दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 14:21 IST
1 / 5शहरांमध्ये किंवा गजबजलेल्या भागात चौकाचौकात ट्रॅफिक लाइट बसवले जातात. वाहतूक सुव्यवस्थितपणे सुरू राहावी आणि वाहतूककोंडीची परिस्थिती उद्भवू नये म्हणून हे केले जाते. रेड सिग्नल म्हणजे वाहने थांबली पाहिजेत. 2 / 5पण, गोष्ट केवळ इतकीच नाही. सिग्नलचा लाल झाला की लोकांनी आपली वाहने थांबवावीत हे जवळपास सगळ्यांनाच माहीत आहे, पण ट्रॅफिक सिग्नलवर असलेल्या झेब्रा क्रॉसिंगच्या आधी वाहने थांबवावी लागतात याकडे काही लोक लक्ष देत नाहीत.3 / 5जर एखादी व्यक्ती झेब्रा क्रॉसिंगच्या वर किंवा पलीकडे वाहन घेऊन थांबली तर ते रेड लाईट उल्लंघन मानले जाते. असे झाल्यास वाहतूक पोलीस चालान कापू शकतात. म्हणूनच, रेड लाईटवर वाहन थांबविण्याचा सल्ला दिला जातो. 4 / 5तसेच, झेब्रा क्रॉसिंगच्या आधी तुमचे वाहन थांबले आहे याची खात्री करा. वास्तविक, रेड लाईट असताना वाहने थांबल्यावर पादचाऱ्यांना रस्त्याच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूने सहज जाता यावे यासाठी झेब्रा क्रॉसिंग बनवण्यात आले आहे.5 / 5म्हणजेच पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग करण्यात आले आहे. वाहनांसाठीचा रेड लाईट लागल्यावर पादचारी झेब्रा क्रॉसिंगच्या वरून रस्ता ओलांडतात. अशा स्थितीत झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे राहिल्यास सर्वसामान्यांना रस्ता ओलांडणे कठीण होऊन बसते. म्हणूनच, जेव्हाही तुम्ही लाल दिव्यावर थांबाल तेव्हा हे लक्षात ठेवा की तुम्हाला तुमचे वाहन झेब्रा क्रॉसिंगच्या आधी थांबवावे लागेल.