भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 20:18 IST
1 / 6Top 5 Expensive Car Owners: आपल्याकडेही महागडी कार असावी, असे बहुतांश लोकांचे स्वप्न असते. पण, या गाड्या इतक्या महागड्या असतात की, सामान्य माणसाला त्या परवडत नाही. देशात काही मोजकेच बिझनेस टायकून किंवा सेलिब्रिटी आहेत, ज्यांच्याकडे खूप महागड्या आणि आलिशान कार आहेत.2 / 6Bentley Mulsanne EWB- भारतातील सर्वात महागडी कार Bentley Mulsanne EWB आहे. या सुपर लक्झरी सेडान कारचे मालक व्हीएस रेड्डी आहेत, जे ब्रिटिश बायोलॉजिक्सचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. जेव्हा ही कार डिलिव्हर करण्यात आली, तेव्हा या कारची किंमत सुमारे १४ कोटी रुपये होती. ही लक्झरी कार ६.७५ लिटर व्ही८ इंजिनने चालते, जे ५०६ एचपी आणि १०२० एनएम टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे.3 / 6Rolls Royce Phantom Series VIII EWB- भारतातील सर्वात महागड्या कारबद्दल बोलतोय अन् त्यात अंबानी कुटुंबाचे नाव नाही, असे शक्यच नाही. भारतातील दुसरी सर्वात महागडी कार Rolls Royce Phantom Series VIII EWB आहे, ज्याची ऑन-रोड किंमत १३ कोटी ५० हजार रुपये आहे. या कारच्या पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाले तर, कारला पॉवर देण्यासाठी ६.७५-लिटर ट्विन-टर्बोचार्ज्ड V12 इंजिन बसवण्यात आले आहे, जे ५६३bhp आणि ९००nm जनरेट करते. 4 / 6Rolls Royce Ghost Black Badge- तिसरी कार रोल्स रॉयस घोस्ट ब्लॅक बॅज आहे, ज्याची किंमत १२ कोटी २५ हजार रुपये आहे. बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी या कारचा मालक आहे. रोल्स-रॉइस ब्लॅक बॅज घोस्टमध्ये ६.७५-लिटर V12 इंजिन असेल, जे स्टँडर्ड कारपेक्षा सुमारे २९hp जास्त पॉवर आणि ५०Nm जास्त टॉर्क जनरेट करते. ब्लॅक बॅज घोस्टचे इंजिन एकूण ६०० PS पॉवर आणि ९०० Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कारचा टॉप स्पीड ताशी २५० किमी आहे. ती ४.६ सेकंदात ० ते १०० किमी/ताशी वेग गाठू शकते.5 / 6McLaren 765 LT Spider- चौथी कार मॅकलरेन ७६५ एलटी स्पायडर आहे, जी हैदराबादचे प्रसिद्ध बिझनेस टायकून नसीर खान यांच्या मालकीची आहे. या कारची किंमत १२ कोटी रुपये आहे. नसीर एक उद्योजक आणि व्यावसायिक आहे. लक्झरी कारच्या प्रेमींमध्ये नसीरचे नाव पहिले येते. याआधीही त्यांनी अनेक लक्झरी कार खरेदी केल्या आहेत. नसीर खानची नवीन कार McLaren 765 LT Spider व्हर्जन या श्रेणीतील सर्वात महागडी असल्याचे म्हटले जाते. 6 / 6Mercedes-Benz S600 Guard- पाचवी कार मर्सिडीज-बेंझ एस६०० गार्ड आहे, जी मुकेश अंबानीच्या प्रभावी कलेक्शनमध्ये समाविष्ट असलेल्या लक्झरी कार्सपैकी एक आहे. कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, या लक्झरी कारची किंमत १० कोटी रुपये आहे.