शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

230km रेंज, 8 वर्षांची वॉरंटी अन् किंमत फक्त ₹4.99 लाख; नवीन EV कार लॉन्च...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 17:26 IST

1 / 8
MG Motor India : मागील काही वर्षांपासून देशात EV वाहनांची मागणी वाढत आहे. तुम्ही स्वस्त आणि छोटी फॅमिली EV कार घेण्याचा विचार करत असाल, तर 2025 MG Comet EV हा एक चांगला पर्याय असू शकतो. कंपनीने या कारचे नवीन मॉडेलदेखील लॉन्च केले आहे. यामध्ये अनेक नवीन फीचर्स जोडले आहेत. विशेष बाब म्हणजे आता ही कार 8 वर्षांच्या वॉरंटीसह येईल.
2 / 8
MG Motor India ने भारतीय बाजारात 2025 Comet EV लॉन्च केली आहे. या कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कारमध्ये आता मागील पार्किंग कॅमेरा, पॉवर फोल्डिंग आउट साइड रिअर व्ह्यू मिरर, लेदरेट सीट आणि 4-स्पीकर ऑडिओ सिस्टम मिळते. कंपनी यावर 8 वर्षे किंवा 1 लाख 20 हजार किलोमीटरची वॉरंटी देत ​​आहे.
3 / 8
कंपनीने नवीन एमजी कॉमेटची अधिकृत बुकिंगही सुरू केली आहे. या छोट्या इलेक्ट्रिक कारचे बुकिंग कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि अधिकृत डीलरशिपद्वारे 11,000 रुपयांच्या बुकिंग रकमेसह केले जाऊ शकते. ही कार नवीन ब्लॅकस्टॉर्म एडिशनमध्येही विक्रीसाठी उपलब्ध आहे.
4 / 8
MG ने नवीन इलेक्ट्रिक कारमध्ये काही फीचर्स देखील अपडेट केले आहेत. आता यात इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आणि इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेकही दिलेले आहेत. यात क्रिप मोडदेखील आहे, ज्यामुळे ड्रायव्हर ब्रेकवरून पाय काढताच कार पुढे जाऊ लागते. यापूर्वी कॉमेट ईव्ही चालविण्यासाठी ड्रायव्हरला एक्सलेटर दाबावे लागत होते. फास्ट चार्जिंग व्हेरियंटमध्ये 17.4 kWh चा बॅटरी पॅक मिळेल, जो एका चार्जवर 230 किमी पर्यंतची रेंज देईल.
5 / 8
MG कॉमेट EV ची किंमत ₹7 लाखांपासून सुरू होते आणि ₹9.81 लाखांपर्यंत जाते. बॅटरी रेंटल प्रोग्रामसह त्याची किंमत ₹4.99 लाखापासून सुरू होते आणि ₹7.80 लाखांपर्यंत जाते. सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत. 2025 कॉमेट पाच प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे, ज्यामध्ये एक्झिक्युटिव्ह, एक्साइट, एक्साइट फास्ट चार्ज, एक्सक्लुझिव्ह आणि एक्सक्लुझिव्ह फास्ट चार्ज असे पर्याय आहेत.
6 / 8
एमजी कॉमेटच्या आकाराबद्दल बोलायचे झाल्यास, लांबी अंदाजे 2974 मिमी (2.97 मीटर), रुंदी 1505 मिमी, उंची 1640 मिमी आणि व्हीलबेस 2010 मिमी आहे. MG Comet EV चे डिझाईन आणि आकार खूपच आकर्षक आणि कॉम्पॅक्ट आहे. ही शहरांमध्ये ड्रायव्हिंगसाठी योग्य आहे. यात मिनी-हॅचबॅकचा लूक आहे, जो शहरांमध्ये ड्रायव्हिंगसाठी उत्तम आहे. त्याच्या पुढच्या भागात मोठे हेडलाइट्स आणि सिग्नेचर ग्रिल डिझाइन आहे.
7 / 8
MG Comet EV मध्ये कंपनीने ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम विथ इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन, रियर पार्किंग सेन्सर, स्पीड-सेन्सिंग ऑटो डोअर लॉक, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, फॉलो मी होम हेडलाम्प कंट्रोल (इलेक्ट्रॉनिक हेडलाम्प नियंत्रण) यांसारखी वैशिष्ट्ये दिली आहेत.
8 / 8
कारच्या इंटेरिअरबद्दल बोलायचे तर, केबिनमध्ये लेदरेट सीट्स, 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, इलेक्ट्रॉनिकली ऍडजस्टेबल ORVM आणि चार-स्पीकर ऑडिओ सिस्टमदेखील मिळते.
टॅग्स :MG Motersएमजी मोटर्सelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहन