कोण सरस...? टाटा नेक्सॉन आणि मारुती विक्टोरिसची समोरासमोर टक्कर झाली; दोन्ही ५ स्टार, कोणाची काय हालत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 13:29 IST
1 / 7देशात सध्या फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळविण्याची स्पर्धा सुरु झाली आहे. मारुतीच्या शून्य ते तीन स्टार रेटिंगवाल्या कारना नकार देत हजारो लोक टाटाच्या दणकट गाड्या घेत होते. हा धोका ओळखून आता मारुतीनेही फाईव्हस्टार सेफ्टी रेटिंगच्या गाड्या बनविण्यास सुरुवात केली आहे. 2 / 7टाटाची सर्वात पहिली फाईव्ह स्टार मिळविलेली कार नेक्सॉन आणि मारुतीची दुसरी फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळविणारी कार विक्टोरिस यांची उत्तराखंडमध्ये जोरदार टक्कर झाली आहे. 3 / 7टाटा नेक्सॉन आणि मारुती विक्टोरिस यांच्या या अपघाताचा व्हिडीओ कमालीचा व्हायरल होत आहे. दोन्ही ग्लोबल एनकॅपमध्ये फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग असलेल्या गाड्या एकमेकांना धडकण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. या व्हायरल व्हिडीओनंतर कोणती कार अधिक सुरक्षित ठरली यावरून मोठी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. 4 / 7टाटा नेक्सॉन: अपघाताच्या व्हिडिओनुसार, टाटा नेक्सॉन (प्री-फेसलिफ्ट मॉडेल) च्या पुढील उजव्या भागाला जोरदार धडक बसली. यात बंपर, हेडलाईट, फेंडर आणि अगदी चालकाच्या बाजूचे चाकही मोठ्या प्रमाणात निकामी झाल्याचे दिसत आहे. 'नेक्सॉन' गाडीची मजबूत बांधणी असूनही झालेले हे नुकसान अनेकांना आश्चर्यचकित करणारे आहे.5 / 7मारुती विक्टोरिस: दुसरीकडे, मारुती विक्टॉरिस (ज्याला नवीन BNCAP/GNCAP मध्ये ५-स्टार रेटिंग मिळाले आहे) तुलनेने कमी दुर्घटनाग्रस्त झाली. तिचे बंपर आणि फेंडर तुटले असले तरी, कारचा मुख्य सांगाडा शाबूत राहिली आणि तिची चाकेही कार्यरत स्थितीत दिसली.6 / 7या अपघातामुळे अनेक वाहनतज्ज्ञांनी आणि ग्राहकांनी या दोनही गाड्यांच्या सुरक्षा मानकांवर चर्चा सुरू केली आहे. दोन्ही कंपन्यांनी कठोर क्रॅश टेस्टमध्ये ५-स्टार रेटिंग मिळवले आहे. नेक्सॉनच्या क्रंपल झोनने धडकेची ऊर्जा प्रभावीपणे शोषून घेतली असावी, ज्यामुळे प्रवाशांच्या केबिनचे मोठे नुकसान टळले. तर 'विक्टोरिस'ची आधुनिक रचना आणि नवीन सुरक्षा तंत्रज्ञान या धडकेत प्रभावी ठरले, असे तज्ज्ञांचे मत आहे.7 / 7या अपघातात जीवितहानी झाली की नाही, याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या धडकेनंतर दोन्ही वाहनांचे प्रवासी कक्ष मोठ्या प्रमाणात सुरक्षित राहिल्याने, 'सुरक्षा रेटिंग' असलेली वाहने निवडणे किती महत्त्वाचे आहे, हे अधोरेखित होते.