लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 21:26 IST
1 / 7 भारतीय बाजारात महिंद्राची 'थार' खूप लोकप्रिय आहे. पण, आता याच थारला टक्कर देण्यासाठी मारुती सुझुकी आपली नवीन 'जिमनी' लॉन्च करणार आहे. 2 / 7 मिळालेल्या माहितीनुसार, मारुतीची जिमनी लवकरच भारतीय बाजारात लॉन्च होऊ शकते. कंपनीने 2020 ऑटो-एक्स्पोमध्ये तीन दरवाज्यांची जिमनी सिएरा प्रदर्शित केली होती.3 / 7 मारुती सुझुकी इंडियाचे कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले की, जिमनीला भारतात लॉन्च करण्याच्या पर्यायावर विचार केला जात आहे. 4 / 7 सध्या भारताच्या कार मार्केटमध्ये SUV सेगमेंटचा वाटा 32 टक्क्यांवरुन 40 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. याच कारणामुळे मारुती सुझुकी स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल (SUV व्हेईकल) सेगमेंटमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. 5 / 7 मारुतीकडे या सेगमेंटमध्ये ब्रेझा आणि एस-क्रॉस या दोनच कार आहेत. जिमनी भारतीय बाजारपेठेत लॉन्च होणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती.6 / 7 या कारची थेट स्पर्धा भारतीय बाजारपेठेत आपला दबदबा निर्माण करणाऱ्या महिंद्राच्या 'थार'शी असेल. मारुती सुझुकीच्या जिमनीला आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 7 / 7 ही एसयूव्ही जापान आणि युरोपमध्ये खूप लोकप्रिय झाली असून, याचे उत्पादन भारतात झाले आहे. गेल्या वर्षाच्या सुरुवातीपासून याचे उत्पादन हरियाणातील गुरुग्राम येथे सुरू आहे.