शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मारुती अर्टिगा, XL6 ला टक्कर देण्यासाठी येते नवी एमपीव्ही Citroen Berlingo, पाहा विशेष बाबी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2022 5:18 PM

1 / 9
लोकप्रिय फ्रेन्च ऑटोमोबाईल कंपनी सिट्रोएन (Citroen) या वर्षी भारतात आपली पहिली 7 सीटर MPV लाँच करू शकते. त्यानंतर सिट्रोएन इतर सेगमेंटमध्येही विस्तार करण्याची शक्यता आहे.
2 / 9
लवकरच कंपनी आपली छोटी SUV Citroen C3 लाँच करणार आहे, जी टाटा पंच सारख्या लोकप्रिय मायक्रो एसयूव्हीशी स्पर्धा करेल. सिट्रोएन Berlingo ही उत्कृष्ट लुक आणि विशेष वैशिष्‍ट्ये असलेली MPV असेल.
3 / 9
ही कार मारुती सुझुकी एर्टिगा या सेगमेंटच्‍या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या कारसह इतर MPV शी स्पर्धा करेल. या MPV ची युरोपियन देशांमध्ये यापूर्वीच विक्री सुरू करण्यात आली आहे.
4 / 9
गेल्या वर्षी सिट्रोएनची एमपीव्ही बरलिंगो भारतीय रस्त्यांवर टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली होती. यानंतर ही लवकरच भारतात लाँच केली जाऊ शकते अशा शक्यता वर्तवण्यात आल्या होत्या.
5 / 9
या कारच्या लुक आणि फीचर्सबद्दल सांगायचं झालं तर ही PSA च्या नव्या EMP2 प्लॅटफॉर्मवर डेव्हलप करण्यात आली आहे. ही एमपीव्ही दोन व्हेरिअंटमध्ये सादर केली जाऊ शकते.
6 / 9
यामध्ये Citroen Berlingo Standard ची लांबी 4400mm आणि Citroen Berlingo XL ची लांबी 4750mm असेल. सिट्रोएन बरलिंगोमध्ये सिग्रेचर फ्रंट ग्रिल, स्प्लिट हेडलँप्स, रियर आणि फ्रंट बंपर वर ब्लॅक क्लॅडिंग आणि स्टील व्हील्जसोबत नवे डिजाइन एलिमेंट्स दिसतील.
7 / 9
मीडिया रिपोर्ट्सनुसार Citroen Berlingo पेट्रोल आणि डिझेल इंजिन दोन्ही पर्यायांसह ऑफर केली जाऊ शकते. यामध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिन 108 bhp ची पॉवर जनरेट करू शकते आणि 1.5 लिटर डिझेल इंजिन 128 bhp ची पॉवर जनरेट करू शकते.
8 / 9
Citroen Berlingo मध्ये अनेक उत्तम वैशिष्ट्ये दिसण्याची अपेक्षा आहे. यामुळे ते भारतातील टाटा (Tata), महिंद्रा (Mahindra), ह्युंदाई (Hyundai) आणि मारुती (Maruti) च्या SUV आणि MPV च्या ग्राहकांना आकर्षित करू शकतील. मात्र, कंपनीच्या अधिकृत निवेदनानंतरच याबाबत आगामी काळात काही स्पष्ट होईल.
9 / 9
सिट्रोएन बरलिंगो 6 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह लॉन्च केले जाऊ शकते. बर्लिंगोच्या संभाव्य किंमतीबद्दल बोलायचे झाले तर ही कार 12 लाख रुपयांपर्यंतच्या सुरुवातीच्या किमतीत ऑफर केले जाऊ शकते.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहन