Mahindra XEV 9e vs Tata Harrier EV: भारतातील सर्वात प्रीमियम इलेक्ट्रिक SUV कोणती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 17:08 IST
1 / 7 Mahindra XEV 9e VS Tata Harrier EV: भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्र आता वेगाने इलेक्ट्रिक वाहनांकडे (EV) वळत आहे. या बदलाचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे, दोन भारतीय दिग्गज कंपन्या Mahindra आणि Tata Motors ने आपल्या नवीन प्रीमियम इलेक्ट्रिक SUV लॉन्च केल्या आहेत. Mahindra XEV 9e आणि Tata Harrier EV दोन्ही SUVs दिसण्यात आकर्षक, चालवायला दमदार आणि फीचर्सच्या बाबतीत लक्झरी कार्सना टक्कर देणाऱ्या आहेत.2 / 7Mahindra XEV 9e - महिंद्राची नवी XEV 9e पहिल्याच नजरेत “भविष्याची SUV” असल्याची झलक देते. याचा कूप-स्टाइल डिझाईन, मोठे बॉडी स्ट्रक्चर आणि आकर्षक LED लाइटिंग तिला अत्यंत प्रिमियम लुक देतात. शिवाय, ग्लास-रुफ लायटिंग आणि मिनिमलिस्ट डॅशबोर्डमुळे केबिन आधुनिक आणि “फ्यूचरिस्टिक” वाटतो.3 / 7ड्रायव्हिंग अनुभवाच्या दृष्टीने XEV 9e अतिशय स्मूद आणि रिफाइंड आहे. यात सिंगल मोटर सेटअप दिला असला तरी, परफॉर्मन्स कोणत्याही ड्युअल मोटर SUV पेक्षा कमी नाही. हलके स्टीयरिंग, सेमी-ऍक्टिव्ह सस्पेन्शन आणि एकदा चार्ज केल्यावर 450 ते 500 किमी रेंज ही तिची मोठी ताकद आहे.4 / 7 Tata Harrier EV - टाटा मोटर्सची Harrier EV ही कंपनीची फ्लॅगशिप इलेक्ट्रिक SUV आहे. ही गाडी तिच्या मजबूत डिझाईन, ऑफ-रोड क्षमता आणि टेक्नॉलॉजी अपडेट्ससाठी ओळखली जाते.5 / 7 बाहेरुन पारंपरिक Harrier सारखी दिसते, पण आतील भाग पूर्णपणे नवा आणि टेक्नॉलॉजिकल अॅडव्हान्स्ड आहे. यात डिजिटल मिरर, 540-डिग्री कॅमेरा, आणि जास्त फिजिकल कंट्रोल बटन्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे ड्रायव्हिंग अधिक सोपी आणि सुरक्षित होते.6 / 7 Harrier EV मध्ये ड्युअल मोटर (AWD) सिस्टम आहे, ज्यामुळे ती कोणत्याही रस्त्यावर उत्कृष्ट ट्रॅक्शन आणि पॉवर देते. ही SUV 400 ते 430 किमी रेंज देते. तिचे रग्ड सस्पेन्शन, उच्च ग्राउंड क्लिअरन्स, आणि मजबूत अंडरबॉडी प्रोटेक्शन यामुळे ती ऑफ-रोडिंगसाठी परफेक्ट ठरते.7 / 7 कुठली SUV जास्त फायदेशीर? Mahindra XEV 9e ची किंमत अंदाजे ₹28 ते ₹32 लाखांदरम्यान असू शकते. तर, Tata Harrier EV ₹24 ते ₹29 लाखांदरम्यान मिळेल. तुम्ही फ्यूचरिस्टिक, स्टायलिश आणि टेक-फोकस्ड SUV शोधत असाल, तर Mahindra XEV 9e हा उत्तम पर्याय ठरेल. पण, तुम्हाला रॉ पॉवर, दमदार परफॉर्मन्स आणि मजबूत SUV फील हवी असेल, तर Tata Harrier EV तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरेल.