240km रेंज अन् 115km/h टॉप स्पीड; या कंपनीने लॉन्च केली 2 तासात चार्ज होणारी EV स्कूटर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 19:24 IST
1 / 7भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये चीनची नवीन कंपनी लॉनकिन मोटरसायकल (Loncin Motorcycles) ची एंट्री झाली आहे. कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर रिअल 5T (Real 5T) लॉन्च केली आहे. लॉनकिन BMW कंपनीच्या F 850 GS आणि F 900 R बाइकसाठी इंजिन बनवण्याचे काम करते.2 / 7 रिअल 5T एक मॅक्सी स्कूटर असून, याची टॉप स्पीड 115kmph आहे. या स्कूटरमध्ये सेंट्रली माउंटेड मोटर बसवलेली आहे. ही ई-स्कूटर फूक अट्रॅक्टिव्ह आणि स्पोर्टी दिसते. या स्कूटरच्या समोर एक लहान विंडशील्डदेखील बसवली आहे.3 / 7 रिअल 5T चे डिझाइन-रिअल 5T च्या डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास याच्या स्कूटरच्या समोर स्प्लिट LED हेडलाइट दिली आहे. या स्कूटरचे बॉडीवर्क अतिशय शार्प दिसून येतो. 4 / 7 याच्या फ्रंट विंडशील्डवर कंपनीचा लोगो दिसतो. तुम्हाला रेसिंगचा अनुभव मिळावा, या हेतूनच याचे डिझाइन तयार केले आहे. सुरक्षेसाठी याच्या फ्रंट व्हीलवर डिस्क ब्रेक मिळतो. या स्कूटरला ब्लॅक आणि मेटॅलिक सिल्वर थीम दिली आहे. रिअल 5T ची रेंज- लॉनकिनच्या या इलेक्ट्रिक-स्कूटरला 125cc पेट्रोल स्कूटरच्या बरोबरीने पॉवर देण्यात आली आहे.5 / 7 या स्कूटरमध्ये 15bhp च्या आउटपुटसह एक सेंट्रली-माउंटेड मोटर मिळेल. या स्कूटरची टॉप स्पीड 115kmph आहे. स्कूटरमध्ये 2.4kWh लिथियम-आयन बॅटरी दिली आहे.6 / 7 कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्जवर ही स्कूटर तब्बल 240km ची रेंज देते. या स्कूटरसोबत 1.84kW चार्जर मिळते, जो या स्कूटरला फक्त 2 तासात 80% चार्ज करतो. रिअल 5T चे फीचर्स- रिअल 5T मध्ये सर्व ठिकाणी LED लाइट्सचा वापर केला आहे. यात तीन रायडिंग मोड, ट्रॅक्शन कंट्रोल, ऑटोमॅटिक वॉर्निंग लाइट्स, एक चार्जिंग पोर्ट आणि रिव्हर्स गिअर दिला आहे. या7 / 7 स्कूटरच्या फ्रंटमध्ये टेलिस्कोपिक फोर्क्स आणि रिअरमध्ये ऑफसेट शॉक दिला आहे. ब्रेकिंगसाठी सिंगल फ्रंट डिस्क आणि रिअर ड्रम यूनिट आहे. लॉनकिनने रिअल 5T सह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एंट्री करण्याची तयारी केली आहे.