संधी गमावू नका; या स्पोर्ट्स बाईक्सवर मिळतोय १ लाख रुपयांचा डिस्काउंट, जाणून घ्या किंमत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 12:59 IST
1 / 5Kawasaki Bikes: तुम्ही नवीन स्पोर्ट्स बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. कारण Kawasaki इंडिया त्यांच्या काही स्पोर्ट्स बाईक्सवर ३१ जुलै २०२५ पर्यंत १ लाख रुपयांपर्यंतची सूट देत आहे. ही ऑफर चार मॉडेल्सवर लागू आहे. यात Kawasaki Ninja ZX-10R, Versys 1100, Versys 650, and Versys-X 300 चा समावेश आहे. हे फायदे एक्स-शोरूम किंमत, विमा आणि आरटीओ शुल्कावर दिले जातील. 2 / 5Kawasaki Ninja ZX-10R- या बाईकवर १ लाख रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. या सुटनंतर बाईकची किंमत १८.५० लाख रुपयांपेक्षा कमी झाली आहे (एक्स-शोरूम). या बाईकमध्ये ९९८ सीसी इनलाइन-फोर-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे, जे १३,२०० आरपीएम वर २०० बीएचपी आणि ११,४०० आरपीएम वर ११४.९ एनएम टॉर्क जनरेट करते. यात बाय-डायरेक्शनल क्विक शिफ्टरसह सहा-स्पीड गिअरबॉक्स, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह टीएफटी डिस्प्ले, मल्टीपल राइड मोड्स, लॉन्च कंट्रोल, क्रूझ कंट्रोल आणि बरेच काही आहे.3 / 5Kawasaki Versys 1100- या बाईकवर तुम्हाला १ लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. १२.९० लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमत असलेली ही स्पोर्ट्स टूरर अलीकडेच २०२५ मध्ये थोड्या मोठ्या १,०९९ सीसी इंजिनसह अपडेट करण्यात आली आहे. ही ९,००० आरपीएम वर १३३ बीएचपी आणि ७,६०० आरपीएम वर ११२ एनएम जनरेट करते. तसेच, ६-स्पीड रिटर्न ट्रान्समिशनने सुसज्ज असून, त्यात स्लिपर आणि असिस्ट क्लच मिळते.4 / 5Kawasaki Versys 650- अॅडव्हेंचर टूरर Versys 650 वर 25,000 रुपयांची सूट मिळत आहे, ज्यामुळे त्याची किंमत 7.77 लाख रुपयांवरून 7.52 लाख रुपयांपर्यंत कमी झाली आहे (एक्स-शोरूम). यात 649 cc पॅरलल-ट्विन इंजिन आहे, जे 65.7 bhp आणि 61 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. यात LED लाईट्स, स्मार्टफोन पेअरिंगसह TFT स्क्रीन, स्विचेबल ट्रॅक्शन कंट्रोल, ABS आणि USB चार्जर सारखे फिचर्स मिळतात.5 / 5Kawasaki Versys-X 300- Kwasaki Versys-X 300 वर 15,000 रुपयांची सूट मिळत आहे. यात 296 cc पॅरलल-ट्विन इंजिन आहे. जे 1,500 rpm वर 38.5 bhp आणि 10,000 rpm वर 26.1 Nm जनरेट करते. यात स्लिपर क्लचसह ६-स्पीड गिअरबॉक्स मिळते.