TATA ची भन्नाट ऑफर! केवळ ३५५५ रुपये भरा आणि 'ही' कार घरी आणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 17:54 IST
1 / 10कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत आलेला वाहन उद्योग हळूहळू सावरताना दिसत आहे. TATA ने भारतीय बाजारात जोरदार पुनरागमन केले असून, TATA च्या अनेकविध गाड्या ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. 2 / 10TATA ने इलेक्ट्रिक कार सादर करूनही बाजारात बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे. तरीही अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी TATA कडून विशेष ऑफर्स आणल्या जात आहेत. 3 / 10टाटा मोटर्स आपल्या हॅचबॅक कार TATA Tiago वर एक जबरदस्त ऑफर देत आहे. खूपच कमी ईएमआयवर तुम्हाला ही कार घरी आणता येईल. टाटाची ही कार सर्वात सुरक्षित कार पैकी एक आहे.4 / 10TATA Tiago या कारला NCAP च्या क्रॅश टेस्टमध्ये ४ स्टार रेटिंग मिळाली आहे. टाटा मोटर्सच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, फायनान्स केल्यानंतर ग्राहकाला केवळ ३५५५ रुपयांचा मासिक हप्ता देऊन (Monthly EMI) कार घरी घेऊन जाता येईल. 5 / 10TATA Tiago या कारमध्ये BS6 कम्पलायंट १.२ लीटर, ३ सिलिंडरची कॅपिसिटीचे पेट्रोल इंजिन दिले असून, 6000rpm वर 86PS ची पॉवर आणि 3300rpm वर 113Nm चे टॉर्क जनरेट करते. ही कार ५ स्पीड मॅन्यूअल आणि ऑटोमॅटिक गियरबॉक्स सोबत येते. 6 / 10TATA Tiago मध्ये सेफ्टीसाठी यात अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशन, कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोल, ड्युअल फ्रंट एयरबॅग, रियर पार्किंग सेन्सर आणि स्पीड अलर्ट सिस्टम यासारखे जबरदस्त फीचर्स दिले आहेत.7 / 10TATA Tiago मध्ये १५ इंचाच्या अलॉय व्हील सोबत रियर डिफॉगर, ७ इंचाचा इन्फोटेनमेंट सिस्टम मिळणार आहे. तसेच Harman चे ८ स्पीकर सिस्टम, ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल आणि कूल्ड ग्लव बॉक्स सारखे फीचर्स मिळतील.8 / 10TATA Tiago ही कार फ्लेम रेड, एरिजोना ब्लू, पर्लसेंट व्हाइट, डेटोना ग्रे आणि प्योर सिल्वर कलर मध्ये उपलब्ध आहे. TATA Tiago ची किंमत ४.८५ लाख रुपये ते ६.८४ लाख रुपये आहे.9 / 10दरम्यान, Tata Tigor या गाडीनेही मार्च महिन्यात तब्बल १ हजार ५९१ टक्के विक्रीची नोंद केली आहे. मार्च महिन्यात या गाडीच्या २ हजार ०९७ युनिट्सची विक्री करण्यात आली आहे. प्रीमियम हॅचबॅक Tata Altroz च्या तब्बल ७ हजार ५५० युनिट्सची विक्री केली आहे.10 / 10तसेच Tata Altroz ने मार्च महिन्यात आपले विक्रीचे सर्व रेकॉर्ड्स मोडून काढल्याचे पाहायला मिळत आहे. Tata कंपनीने मार्च २०२१ या एका महिन्यात अल्ट्रोझच्या विक्रीत तब्बल ५५७ टक्के वाढ साध्य केली आहे.